सुगीचे दिवस आले तर काही दरवेशी हे अस्वलाला घेऊन बाहेर पडतात, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 20:34 IST2018-10-30T20:34:31+5:302018-10-30T20:34:53+5:30

सुगीचे दिवस आले तर काही दरवेशी हे अस्वलाला घेऊन बाहेर पडतात अशी टीका राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली आहे.

Sadabhau Khot criticise Raju Shetti | सुगीचे दिवस आले तर काही दरवेशी हे अस्वलाला घेऊन बाहेर पडतात, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर बोचरी टीका

सुगीचे दिवस आले तर काही दरवेशी हे अस्वलाला घेऊन बाहेर पडतात, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर बोचरी टीका

मुंबई - सुगीचे दिवस आले तर काही दरवेशी हे अस्वलाला घेऊन बाहेर पडतात अशी टीका राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली आहे. राज्यात उस आंदोलन सुरु झालं आहे., उसाच्या तोडी रोखल्या जात आहेत, त्याबाबत तुमची प्रतिक्रीया काय हे विचारल्यानंतर सदाभाऊ खोतांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टिका करुन उस आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. आंदोलन करणारे हे सुगीच्या काळापर्यत अस्वलाला नाचविणार आहेत, असे विधान देखील सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना केल आहे. आता ज्या साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलन करताय, ते तुमचे भाऊबंद आहेत. त्यामुळं त्याच्याबरोबर मांडीला माडी लाऊन बसून हा प्रश्न निकालात काढा असा सल्ला देखील सदाभाऊ  खोतांनी खासदार राजू शेट्टी यांना दिला आहे.

Web Title: Sadabhau Khot criticise Raju Shetti