शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Sachin Vaze: “तुम्ही IPS अधिकारी, राजकारण्यांचं आयुष्य फक्त ५ वर्ष; बदलीशिवाय काहीच करू शकत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 18:46 IST

Retired IPS Officer Suresh Khopade reaction on Sachin Vaze & Mumbai Police Issue: लोकशाही प्रक्रियेत पोलिसांना काम करताना राज्यकर्त्यांचे ऐकावं लागतं, राजकीय हस्तक्षेप असतो हे खरं आहे

ठळक मुद्देपोलीस दलाची कार्यपद्धती पूर्णपणे कालबाह्य झाली आहे, हे बदलण्याचं काम आयपीएस अधिकाऱ्यांनी केलं पाहिजेआरामात आयुष्य जावं, मुंबईत बदली व्हावी, चांगली पोस्टींग मिळावी हा विचार आयपीएस अधिकारी करतातराजकारण्याचं बळी व्हायचं की नाही हे पोलीस अधिकाऱ्याने ठरवायचं असतं

मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळली होती, या प्रकरणी NIA तपास करत आहेत, या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे, त्यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. या संपूर्ण प्रकरणावर निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी भाष्य केले आहे. राजकारण्याचं आयुष्य फक्त ५ वर्ष असतं मग त्यांचं कशाला काहीही ऐकायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.(Retired IPS Officer Suresh Khopade on Sachin Vaze Case)  

सचिन वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय सरकारचा नाही, तर...?; गृहमंत्री अनिल देशमुखांचा मोठा खुलासा

याबाबत लोकमतनं सुरेश खोपडे यांच्याशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की, लोकशाही प्रक्रियेत पोलिसांना काम करताना राज्यकर्त्यांचे ऐकावं लागतं, राजकीय हस्तक्षेप असतो हे खरं आहे, कारण लोकप्रतिनिधींना लोकांना उत्तर द्यावं लागतं, पण सचिन वाझेंना त्यांच्या चुकीबद्दल अटक झाली, परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली झाली, लोकं म्हणतात राजकारण्यांनी यांचा बळी दिलाय, पण मी ३५ वर्ष पोलीस सेवेत काम केले आहे, राजकारण्याचं बळी व्हायचं की नाही हे पोलीस अधिकाऱ्याने ठरवायचं असतं, राजकारण्यांनी काहीही सांगितलं तरी प्रतिक्रिया काय द्यायची हे आयपीएस अधिकाऱ्यांच्या हातात असतं, म्हणून आयपीएस अधिकारी आणि वरिष्ठ पोलिसांवर दोष येऊन पोहचतो, मीदेखील आयपीएस अधिकारी म्हणून निवृत्त झालो, आमचं एकूण आयुष्य ६० वर्ष असतं, उघडपणे भानगडी न करता फक्त पाट्या टाकल्या तरी ६० वर्ष आम्हाला कोणीही हलवू शकत नाही, पण राजकारण्यांना ५ वर्ष आयुष्य असतं, मग हे लोक आपल्याला बदली व्यतिरिक्त काही करू शकत नाही असं माहिती असेल तर आयपीएस अधिकाऱ्याला मानानं काम करता येतं आणि योग्य व्यक्तिला न्याय देता येतो असं त्यांनी सांगितले.

“भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात असल्यानं दिल्लीवारी”

त्याचसोबत मी सातारला एसपी असताना एका गंभीर आरोपाखाली छत्रपती उदयनराजे(Chhatrapati Udayanraje Bhosale) यांना मंत्री असताना अटक करून गुन्हा दाखल केला होता, तेव्हा गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) गृहमंत्री होते, त्यांनी थेट मला उदयनराजेंना का अटक केली असा प्रश्न केला होता, तुम्ही आमच्या विरोधी आहात, बघून घेऊ असं ते म्हणाले होते, त्यानंतर माझी २ महिन्याने बदली करण्यात आली, पण काही फरक पडला नाही. मी माझं काम केले होते, अधिकारी बदलला म्हणजे तो दोषी होता हे सिद्ध होतं नसतं, बदली झाल्यानंतर तपास सुरु असतो, तपास सहसा बंद करता येत नाही, कायदेशीर प्रक्रिया पाहिली तर तपास कोर्टातच थांबवता येतो, बदली झाली तरी तपास प्रक्रिया थांबणार नाही असं सांगत सुरेश खोपडे यांनी परमबीर सिंग यांची बदली झाली तरी त्यांचा तपास होऊ शकतो असं म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईत मी ८ वर्ष नोकरी केली आहे, पोलीस दलाचा अभ्यास करून मी ७  पुस्तके लिहिली आहेत, पोलीस दलाची कार्यपद्धती पूर्णपणे कालबाह्य झाली आहे, हे बदलण्याचं काम आयपीएस अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, राजकारण्यांना पोलीस दलातील सुक्ष्म गोष्टी कळत नाही, पण आरामात आयुष्य जावं, मुंबईत बदली व्हावी, चांगली पोस्टींग मिळावी हा विचार आयपीएस अधिकारी करतात, जर या गोष्टी सोडल्या तर पोलीस दलात खूप सकारात्मक बदल होती, पोलीस दलासोबतच राजकीय सिस्टिमही बदलण्याचा विचार व्हायला हवा असंही मत निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी व्यक्त केलं आहे.

पाहा संपूर्ण मुलाखत 

 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMumbai policeमुंबई पोलीसPoliticsराजकारणPoliceपोलिसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपा