शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

ठाकरेंची मुलाखत म्हणजे अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा, त्यामुळे ठसका लागणारच; शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 07:25 IST

फडणवीस हे किमान बोलावे व लिहावे असे व्यक्तिमत्त्व, बाकी सगळे पादरे पावटेच; शिवसेनेचा टोला.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन भाग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांनी त्यांनी उत्तरं दिली होती. दरम्यान या मुलाखतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देत मॅच फिक्सिंग असा उल्लेख केला होता. त्यावरून आता शिवसेनेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही फडणवीसांच्या वक्तव्याची दखल घेतली. कारण ज्यांच्यावर किमान बोलावे व लिहावे असे ते व्यक्तिमत्त्व आहे. बाकी सगळे पादरे पावटेच आहेत, असे म्हणत शिवसेनेने टोला लगावला.

ठाकरे यांची मुलाखत चोखून खाण्याची चीज नाहीच. तो अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा आहे. त्यामुळे ठसका लागणारच! विरोधकांचे तसेच झाले आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हटलेय अग्रलेखात?फडणवीस व त्यांच्या सरकारला नैतिकतेचे कितीही प्रवचन झोडू द्या, खरे काय ते लोकांना माहीत आहे. ‘ठाकरे-राऊत’ मुलाखतीचा भूकंप म्हणजे मॅच फिक्सिंग असा आरोप करणारे फडणवीस हे काही ‘श्रीमान सत्यवादी’ नाहीत. फडणवीस म्हणतात, ठाकऱ्यांची मुलाखत वाचनीय नाही. याचा सरळ अर्थ असा की, अस्सल मराठमोळा ठेचा असलेल्या या मुलाखतीने त्यांना ठसका लागला, जळजळ झाली. त्याला कोणी काय करायचे?, असा सवालही शिवसेनेने केला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, ‘आपण उद्धव ठाकरे यांची मुलाखत वाचली नाही, पाहिली नाही. ठाकरे यांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग आहे.’ यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. जर त्यांनी ती वाचली नसेल म्हणजे ते राजकीय पुरुष नाहीत. कारण उद्धव ठाकरे हे काय बोलतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. फडणवीस यांची मानसिक स्थिती समजून घेतली तर त्यांचे बोलणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे शिवसेनेने नमूद केले आहे.

असे प्रश्न तरी दिसत नाहीअक्षय कुमार मोदींना विचारतात, ‘‘आदरणीय पंतप्रधानजी, आपण आंबे कापून खाता की चोखून खाता?’’ असे प्रश्न तरी ठाकरे-राऊत मुलाखतीत दिसत नाहीत. ठाकरे यांची मुलाखत चोखून खाण्याची चीज नाहीच. पंतप्रधानांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग आहे असे आम्ही म्हणणार नाही, असेही शिवसेनेने म्हटलेय.

मंत्रिमंडळाचा अतापता एक महिन्यानंतरही नाही. इतके फिक्सिंग करून सरकार जन्माला घातले, पण ते रडत नाही की हात-पाय हलवत नाही, हा चिंतेचा विषय आहे. सरकारचा जन्म अनैसर्गिक परिस्थितीत झाला की दुसरे काय व्हायचे?, असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ