शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:10 IST

Ajit Pawar NCP: गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांना पक्षाने धक्का दिला. 

Rupali Thombre Patil Amol Mitkari: रुपाली चाकणकरांना घेरणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाने स्पष्ट मेसेज दिला. तर अमोल मिटकरी यांनाही अजित पवारांनी धक्का दिला. पुण्यातील रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे. अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्त्यांची नवीन नावे जाहीर केली आहेत. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे. यात नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक, वादामुळे चर्चेत आलेले सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे की, 'आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.'

'ही नियुक्ती पक्षाच्या सशक्त संघटनात्मक रचनेत एक महत्त्वाचा टप्पा असून, राज्यभरात पक्षाची विकासाभिमुख विचारधारा प्रभावीपणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ही पावले अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सर्व नवनियुक्त प्रवक्त्यांकडून पक्षाच्या धोरणांचा प्रसार, जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामांन्यांपर्यंत पोहोचविण्यास मोठी मदत होणार आहे', असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने नवी प्रवक्त्यांची घोषणा केली. 

चाकणकरांचा ठोंबरेंना शह

फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला होता. या प्रकरणात रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचाही विषय काढला होता. 

दोन्ही नेत्यांच्या भांडणात रुपाली चाकणकरांनी रुपाली ठोंबरे पाटील यांना शह दिल्याची चर्चा आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली असतानाच त्यांची प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे. 

दुसरीकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमोल मिटकरींनी भाजपविरोधात थेट भूमिका घेतली जात आहेत. ते सातत्याने भाजपला लक्ष्य करत असल्याने त्यांना प्रवक्तेपदावरून दूर केल्याची चर्चा आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन प्रवक्ते कोण?

आमदार अनिल पाटील

आमदार चेतन तुपे

आमदार सना मलिक

हेमलता पाटील

राजीव साबळे

सायली दळवी

रुपाली चाकणकर

आनंद परांजपे

राजलक्ष्मी भोसले

प्रतिभा शिंदे

प्रशांत पवार

शशिकांत तरंगे

ब्रिजमोहन श्रीवास्तव

अविनाश आदिक

सुरज चव्हाण 

विकास पासलकर

श्याम सनेर

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar ousts Rupali Thombre Patil, Amol Mitkari from NCP spokesperson roles.

Web Summary : Rupali Thombre Patil and Amol Mitkari removed as NCP spokespersons by Ajit Pawar. New spokespersons, including Sana Malik and Suraj Chavan, appointed by Sunil Tatkare. Internal party conflicts may have contributed to the decision.
टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणRupali Chakankarरुपाली चाकणकर