तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसता; रुपाली चाकणकरांची चंद्रकांतदादांवर जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 17:13 IST2020-03-17T17:02:58+5:302020-03-17T17:13:10+5:30
मागची वर्षे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसता; रुपाली चाकणकरांची चंद्रकांतदादांवर जहरी टीका
मुंबई : भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना मागची वर्षे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.
चाकणकर म्हणाल्यात की, आमच्या पक्षाचा जन्मच सत्तेत झाला आहे. त्यामुळे आम्ही उपाशी आहोत की नाही हे जनता ठरवेल. मात्र तुम्ही नेहमीच कुपोषित दिसत असतात, असा खोचक टोला त्यांनी पाटील यांना लगावला आहे.
आमच्या पक्षाचा जन्मच सत्तेत झाला आहे. आम्ही उपाशी आहोत की नाही हे जनता ठरवेल,तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसतायत.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 16, 2020
.
.
सूर्याच्या तेजामुळे वैफल्यग्रस्त झालेली माणसे मग सूर्यावर थुंकायला लागतात..लक्षात ठेवा अजून जवळ याल तर कधी कोळसा होईल सांगता येणार नाही. @ChDadaPatil
तर सूर्याच्या तेजामुळे वैफल्यग्रस्त झालेली माणसे मग सूर्यावर थुंकायला लागतात. मात्र लक्षात ठेवा अजून जवळ याल तर कधी कोळसा होईल सांगता येणार नाही, असेही यावेळी चाकणकर म्हणाल्या. त्यामुळे पाटील यांनी पवारांवर केलेल्या टीकेची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून , पाटील यांना उत्तर देताना पाहायला मिळत आहे.