Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणावर अखेर रुपाली चाकणकर बोलल्या, पोलीस महासंचालकांना दिले पत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 20:40 IST2026-03-20T20:39:01+5:302026-03-20T20:40:03+5:30
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्या पाद्यपूजेच्या फोटोंवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असताना, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणावर अखेर रुपाली चाकणकर बोलल्या, पोलीस महासंचालकांना दिले पत्र!
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्या पाद्यपूजेच्या फोटोंवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असताना, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला आहे. चाकणकर यांनी आज मुंबईत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अशोक खरातवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने अधिकृत पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी खरात प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी कडक सूचना दिल्या आहेत.
आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता… pic.twitter.com/ogoLtBJFfE
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 20, 2026
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "मी आज पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. अशोक खरात याच्यावर असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारींची सखोल आणि वस्तुनिष्ठ चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य उघडकीस आणावे आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून द्यावेत, असे मी पत्रात नमूद केले आहे."
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातची पूजा करतानाचे फोटो व्हायरल होत होते. यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र, आज थेट पोलीस प्रमुखांची भेट घेऊन चाकणकर यांनी या प्रकरणातील तपासाचा पाठपुरावा सुरू केला आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.