शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शहीद राणेंच्या घरी अक्षयने भेट दिल्याची अफवा, सोशल मीडियावर खोटा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 01:51 IST

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या घरी पहाटे ३ वाजता अभिनेता अक्षयकुमार येऊन गेला. त्याने कुटुंबाला नऊ लाखांचा धनादेश आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहीद मेजर यांचे कुटुंबीय खेद व्यक्त करत आहेत.

मीरा रोड - शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या घरी पहाटे ३ वाजता अभिनेता अक्षयकुमार येऊन गेला. त्याने कुटुंबाला नऊ लाखांचा धनादेश आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहीद मेजर यांचे कुटुंबीय खेद व्यक्त करत आहेत. लोकांनी खात्री न करता असले संदेश व्हायरल करून मनस्ताप देऊ नये, अशी विनवणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, पत्नीच्या नावाने खोटी आॅडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांचा शोध पोलीस घेत आहेत.कुठलीही खात्री न करता तसेच पहाटे ३ वा. अक्षयकुमार कशाला येईल, असा विचारही न करता असले मेसेज फॉरवर्ड केले जात असल्याबद्दल राणे यांच्या कुटुंबीयांनी खेद व्यक्त केला आहे. गैरसमज पसरवणारे मेसेज व्हायरल करू नका, असे आवाहन कुटुंबीयांकडून पुन्हा करण्यात आले आहे.७ आॅगस्ट रोजी मंगळवारी पहाटे काश्मीरमध्ये सीमेवर घुसखोरी करणाºया अतिरेक्यांना कंठस्रान घालताना मेजर कौस्तुभ शहीद झाले. ९ आॅगस्ट रोजी मेजर यांच्या अंतिम यात्रेवेळी हजारो नागरिकांनी सहभाग घेत देशाच्या सुपुत्राला मानवंदना दिली. पण, त्याच्या आदल्या दिवसापासून वीरपत्नीचे मनोगत म्हणून निंदाजनक आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. नागरिकांनी क्लिपची सत्यता आणि वस्तुस्थितीचे भान न पाहताच क्लिप फॉरवर्ड केली. अखेर, समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार झाली. मीरा रोड आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनीदेखील गांभीर्याने दखल घेत ही क्लिप खोटी असल्याने फॉरवर्ड करू नये, असे आवाहन केले. खोटे मेसेज व्हायरल करण्यात एका मुलीचाही सहभाग आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र याचा तपास सुरू असल्याने पोलिसांनी जास्त माहिती दिली नाही. मेजर कौस्तुभ यांची मामी वर्षा जाधव यांनीदेखील नागरिकांना आवाहन करत मनस्ताप होईल आणि शहिदाच्या कुटुंबीयांना त्रास होईल, असे काहीही करू नका, असे आवाहन केले आहे.काही ठिकाणाहून शहिदाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी पैसे गोळा केले जात असल्याचे समजल्याने त्याबद्दलही कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती.शासनाकडून २५ तर पालिकेकडून ११ लाखांची मदतकाश्मीर सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने २५ लाख, तर मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वतीने ११ लाख रु पये जाहीर करण्यात आल्याची माहिती महापौर डिम्पल मेहता यांच्या पालिका कार्यालयातून देण्यात आली.मीरा रोडच्या शीतलनगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ राणे हे मंगळवार, ७ आॅगस्टच्या पहाटे सीमेवर घुसखोरी करणाºया अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले.आ. नरेंद्र मेहता यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या वतीने २५ लाखांची रक्कम मेजर यांच्या कुटुंबीयांना जाहीर केली. तर, महापालिकेकडून ११ लाखांची रक्कम जाहीर करत आयुक्तांना तसा प्रस्ताव दिल्याचे महापौरांच्या वतीने पत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :Kaustubh Raneकौस्तुभ राणेAkshay Kumarअक्षय कुमारMaharashtraमहाराष्ट्र