शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

एसटीला शासनाकडून ५८८ कोटींचा रोख परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 5:52 AM

देणी भागविण्यास मदत; एकूण १,२०० कोटींचा मिळाला परतावा

- चेतन ननावरे मुंबई : एसटी महामंडळाकडून विविध प्रवासी वर्गाला प्रवासी भाड्यात देण्यात येणाऱ्या सवलतींचा परतावा राज्य शासनाने दिला आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाला थकीत देणी भागवण्यास मदत होईल. या प्रवास सवलत मूल्याची रक्कम ५८८ कोटी २३ लाख ८७ हजार ४०३ इतकी आहे.एसटीकडून तूर्तास २४ समाजघटकांना विविध प्रकारच्या २७ योजनांमधून प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. त्यासाठी एसटीने शासनाकडे संबंधित सवलत प्रतिपूर्ती रोखीने वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास मान्यता देत शासनाने रोखीने ही रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला.दरवर्षी सुमारे ३८ कोटी प्रवासी एसटीच्या प्रवास भाडे सवलतीचा लाभ घेतात. त्यासाठी सुमारे १३०० कोटींची सवलत एसटी प्रशासन देते. त्याप्रमाणे २०१८-१९ सालातील पहिल्या टप्प्यात एसटीला शासनाने ६०७ कोटी ७४ लाख ७२ हजार ३९८ रुपये रोखीने वितरित केले होते. त्यानंतर पुन्हा सुमारे ५८८ कोटी रुपयांचा परतावा दिल्याने यंदा वर्ष संपण्याआधीच एसटीकडून विविध समाजघटकांना सुमारे १ हजार २०० कोटींपर्यंत सवलत दिली आहे. पूर्वी एसटीला याच रकमेसाठी शासनाला विनवणी करावी लागत होती. मात्र यंदा शासनाकडून तातडीने मिळालेल्या परताव्यामुळे एसटीच्या आर्थिक व्यवहारांची गाडी सुरळीत चालण्यास मदत होईल.यामध्ये विविध १५ योजनांमध्ये प्रवाशांना १०० टक्के सवलत दिली जाते. त्यात स्वातंत्र्यसैनिकांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार, अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आणि इतर घटकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, क्षयरोगी व कर्करोगी अशा विविध समाजघटकांना सध्या एसटीसह शिवशाही बसेसमध्ये विविध टक्के प्रवासी सवलत दिली जाते.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ