शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

 मल्टीफ्लेक्समध्ये पाण्याची बाटली ५० रुपये : कारवाईच होत नसल्याचे स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 04:25 IST

वैधमापन विभागाच्या पेट्रोल पंपांच्या तपासणीतील फोलपणा सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे. पाठोपाठ आता वैधमापन विभागाकडून स्वत:हून कारवाईदेखील केली जात नसल्याचे लोकमत पाहणीतून उघड झाले आहे.

विशाल शिर्के वैधमापन विभागाच्या पेट्रोल पंपांच्या तपासणीतील फोलपणा सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे. पाठोपाठ आता वैधमापन विभागाकडून स्वत:हून कारवाईदेखील केली जात नसल्याचे लोकमत पाहणीतून उघड झाले आहे. गणेशखिंड रस्त्यावरील एका मल्टिप्लेक्समध्ये एका कंपनीच्या पाण्याच्या बाटलीची किंमत तब्बल पन्नास रुपये असून, त्याच कंपनीची बाटली वीस रुपयांना बाजारात मिळत आहे. उघडपणे ग्राहकांची सुरू असलेली लूट वैधमापन उघड्या डोळ्याने पाहत आहे.वस्तू आणि पदार्थांचे वजन योग्य आहे की नाही, तसेच छापील किमतीनुसार याची विक्री होते की नाही, हे तपासण्याचे काम वैधमापन विभागामार्फत केले जाते. शहरातील काही मल्टिप्लेक्समध्ये विविध वस्तूंसाठी अव्वाच्या सव्वा किंमत आकारली जात असल्याचे उघड गुपित आहे. अगदी पाणीदेखील जास्त किमतीने विकले जाते. यातील पळवाट म्हणून काही जणांनी जास्त एमआरपी (अधिकतम विक्री किंमत) छापून आणण्याची खेळी केली. मात्र, त्यावरदेखील वैधमापनकडून कारवाई करण्यात येते.त्याच पार्श्वभूमीवर माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अजहर खान यांनी वैधमापन विभागाकडे माहिती विचारली होती. त्यात शहरातील सिनेमागृहामध्ये किमतीपेक्षा जास्त रक्कम दिल्याच्या किती तक्रारी २०१२ पासूनदाखल आहेत? आणि किती सिनेमागृहांची तपासणी केलीयाची वर्षनिहाय आकडेवारी मागितली होती. त्याला उत्तरादाखल वैधमापनशास्त्र विभागाच्या पुणे जिल्ह्याचे सहायक नियंत्रक नि. प्र. उदमले यांनी २०१२ पासून आत्तापर्यंत १ तक्रारी दाखल झाल्याचे म्हटले आहे.शिवाजीनगर येथील राहुल सिनेमागृहावर छापील किमतीपेक्षा जास्त रकमेने खाद्यपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी मे २०१४ साली कारवाई करण्यात आली. त्यात २ बटाटा वेफर्स, शीतपेयाची बाटली जप्त करण्यात आली होती.त्यासाठी संबंधित सिनेमागृहाकडून २ हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. माहिती अधिकारात असे उत्तर दिले असले तरी किती सिनेमागृहांची तपासणी केली याचे उत्तरच दिलेले नाही. याचाच अर्थ वैधमापन विभागाने सिनेमागृहांची तपासणीच केली नसल्याचे उघड होत आहे. याबाबत वैधमापन विभागाचे उदमले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मी केवळ दोनच महिन्यांपूर्वी येथे आलो आहे. मला माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही, असे उत्तर तीन दिवसांच्या पाठपुराव्यानंतर दिले. वैधमापनचे पुणे विभागीय उपनियंत्रक यांना मोबाईल आणि एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.वैधमापनच्या तपासणीबाबत प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी गणेशखिंड रस्त्यावरील एका मल्टिप्लेक्समध्ये लोकमत प्रतिनिधीने भेट दिली. तेथे बाटलीबंद पाण्यासाठी पन्नास रुपये मोजावे लागतील असे सांगितले. एका कंपनीची गुजरातमध्ये तयार झालेल्या पाण्याच्या एक लिटरच्या बाटलीवर ५० रुपये (सर्व करांसह) अशी किंमत छापण्यात आली आहे. प्रत्यक्ष बिल देताना या बाटलीची किंमत ४२ रुपये आणि जीएसटी ९.९० पैसे असा आकारण्यात आले. म्हणजे या छापील किमतीपेक्षा अधिकच किंमत आकारण्यात आली. विशेष म्हणजे याच कंपनीची एक लिटरची पाण्याची बाटली बाहेर २० रुपयांना मिळत आहे. फक्त ही बाटली नागपूरमध्ये तयार झाली असल्याचा बदल आहे. मात्र, एकाच कंपनीचे दर मल्टिप्लेक्ससाठी वेगळे आणि इतर ठिकाणी वेगळे हा मजेशीर प्रकार या निमित्ताने समोर आला.एकाच कंपनीच्या १ लिटरच्या पाण्याच्या बाटलीची किंमत मल्टिप्लेक्समध्ये एक आणि बाहेर दुसरी असे कसे असू शकते. एखाद्या ब्रँडेड कंपनीची वस्तू देशात कोठेही घेतली तरी त्याची किंमत सारखीच असते. याहीशिवाय पाण्याची किंमत दुधापेक्षा महाग असण्याचे काहीच कारण नाही.- गजानन भोसले, एक ग्राहकपुणे जिल्हा वैधमापन विभाग तपासणीच करीत नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. वैधमापनने २०१२ ते २०१६ या कालावधीत पेट्रोलचोरी प्रकरणी केवळ एका पेट्रोल पंपावर कारवाई झाल्याची माहिती दिली होती. मात्र, गुन्हे अन्वेषण विभाग आणि वैधमापन विभागाने जून आणि जुलै महिन्यात केलेल्या कारवाईत जिल्ह्यातील ९ पेट्रोल पंपांचे पल्सर (इंधनमापन यंत्र) ताब्यात घेतले होते. कारवाईतील हा विरोधाभास पुरेसा बोलका आहे.- अजहर खान, माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते