शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई सुरुच राहणार : साखर आयुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 20:10 IST

साखर आयुक्तालयाने आरआरसीची कारवाई पुढे सुुरुच ठेवल्याने एफअरपीचा भरणा वाढलेला असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्दे पुणे, सोलापूर, अहमदनगरमधील कारखान्यांवर कारवाईराज्यात १५ जानेवारी अखेरीस ५४२ लाख ४३ हजार ९८७ टन ऊस गाळपएफआरपीच्या बदल्यात साखर बारगळणार 

पुणे : उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम थकविणाºया कारखान्यांवर रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावण्याची कारवाई सुरुच राहणार आहे. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर मधील नीचांकी एफआरपी देणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी दिली. एकरकमी एफआरपी मिळावी आणि थकबाकीदार कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करावी या मागणीसाठी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तालयांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. स्वाभिमानीचे प्रवक्ते योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, पंढरपूरचे समाधान फाटे यांसह शेतकरी उपस्थित होते. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीची कारवाई या पुढे सुरुच ठेवण्याचे आश्वासन साखर आयुक्तांनी आंदोलकांना दिले.  राज्यात १५ जानेवारी अखेरीस ५४२ लाख ४३ हजार ९८७ टन ऊस गाळप झाले होते. त्या गाळपानुसार ३१ जानेवारी अखेरीस १३ हजार ३०५ कोटी ६२ लाख रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देणे आवश्यक होते. त्यापैकी ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. साखर आयुक्तालयाने आरआरसीची कारवाई पुढे सुुरुच ठेवल्याने एफअरपीचा भरणा वाढलेला असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. आरआरसी कारवाईपूर्वी केवळ ११ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली होती. त्यात १८ पर्यंत वाढ झाली आहे. बुधवारी सांगलीच्या दत्त इंडिया सहकारी कारखान्याने संपूर्ण एकरकमी एफआरपी दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील काही कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी देण्यासाठी पावले उचलली आहेत. साखर कारखान्यांकडून नियमबाह्य केली जाणारी कपात, मागील आणि चालू हंगामातील एफआरपीची थकबाकी, थकबाकीदार कारखान्यांवर करण्यात येणारी कारवाई अशा विविध तक्रारींचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्याची सूचना साखर आयुक्तांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली. तसेच, पुणे, सोलापूर आणि अहमदनगर येथील नीचांकी एफआरपी देणाऱ्या प्रत्येकी ३ कारखान्यांना आरआरसी बजावण्याचा आदेशही त्यांनी या वेळी दिला. -------------------------------

एफआरपीच्या बदल्यात साखर बारगळणार शेतकऱ्यांच्या मागणीनंतर एफआरपीच्या बदल्यात साखर देण्याच्या निर्णयात अनेक कायदेशीर आणि व्यवहारीक अडचणी येत असल्याने, ही योजना बारगळणार आहे. साखर आयुक्तालयाने शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपी पैकी २० टक्के रक्कमेची साखर देण्याची तयारी केली होती. जीएसटीच्या रक्कमेची साखरही कारखान्यांनी द्यावी असे बजावले होते. मात्र, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या साखरेचे नक्की करायचे काय असा प्रश्न निर्माण झाल्याने, हा निर्णय रद्द करण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी