शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१५० आत्मसमर्पितांना मिळणार छत

By admin | Updated: June 18, 2014 01:24 IST

पोलिसांचा वाढता दबाव व नक्षल चळवळीत होणारी गळचेपी पाहून गेल्या काही वर्षात शंभराहून अधिक नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. दीडशे आत्मसमर्पित

पत्रकार परिषद : जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती गडचिरोली : पोलिसांचा वाढता दबाव व नक्षल चळवळीत होणारी गळचेपी पाहून गेल्या काही वर्षात शंभराहून अधिक नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. दीडशे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना प्रत्येकी १ लाख रूपयाचे घरकुल बांधून देण्यात येणार आहे. यासाठी मुरखळा (नवेगाव ) येथील ६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सन २०१४ या वर्षात १५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यात दलम कमांडर १, डेप्युटी कमांडर २, साधे कमांडर ११ व एका डीसीए दलम कमांडराचा समावेश आहे. आत्मसमर्पण केलेल्या १०८ नक्षलवाद्यांना आधार कार्ड मिळाले असून ४८ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना मतदान ओळखपत्र देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ५० आत्मसमर्पितांनी मतदान केले असल्याचेही पोलीस अधीक्षक हक यांनी सांगितले. १५ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांची नसबंदी खुली करण्यात आली. आत्मसमर्पितांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत असून त्यांना केशरी कार्डसुध्दा मिळणार आहे. आत्मसमर्पित नक्षल्यांना चांगले जीवन व्यतित करण्यासाठी राज्य शासन व पोलीस विभाग कटीबध्द आहे. त्यामुळे चळवळीत असलेल्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून सन्मानाचे जीवन जगावे. त्यांचे मनापासून स्वागत आहे, असेही सुवेझ हक यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)एटापल्लीच्या चकमकीतील नक्षलवाद्याची ओळख पटलीकोटमी जंगल परिसरात गर्देपल्ली ते मंडोली दरम्यानच्या जंगलात १४ जून रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत १ नक्षलवादी ठार झाला.त्याचे नाव बिजू महारू कोल्हा (२९) रा. विकासपल्ली कसनसूर असे आहे, अशी माहिती हक यांनी दिली. बिजू महारू कोल्हा हा नक्षलवादी आहे की काय हे स्पष्ट झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या नावावर ट्रॅक्टर असून आसवंडी या गावी त्याच्या नावावर किराणा दुकानही आहे. बिजू कोल्हा हा नक्षल्यांना जेवण पुरविण्याचे काम करीत असल्याची प्राथमिक मिळाली असली तरी पोलिसांच्या दलम प्रोफाईलमध्ये त्याच्या नावाची नोंद नसल्याचे हक यांनी सांगितले. मात्र गोपनीय माहितीनुसार बिजू कोल्हा हा मलेशिया सदस्य म्हणून काम करीत असल्याचे ते म्हणाले. बिजू कोल्हा हा नक्षल्यांच्या कॅम्पमध्ये काय करीत होता, त्याच्या मृतदेहावर नक्षली गणवेश कसा तसेच त्याच्या हातात मृत्यूवेळी पिस्टल कशी काय होती याही प्रश्नाची चौकशी सुरू आहे. २ फेब्रुवारी २००९ रोजी मरकेगाव चकमकीत शहीद झालेल्या एका जवानाच्या हातातील प्रिस्टल नक्षल्यांनी हस्तगत केली होती. त्याच क्रमांकांची प्रिस्टल बिजू कोल्हा याच्या हातात सापडली.