शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

सेना सत्तेत गेली तर विरोधकाची भूमिका

By admin | Updated: December 1, 2014 02:08 IST

भाजपाने शिवसेनेला सत्तेत बरोबर घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटण्याचे कारण नाही. पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागू नये

मुंबई : भाजपाने शिवसेनेला सत्तेत बरोबर घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटण्याचे कारण नाही. पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागू नये, राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये, म्हणून सरकारला पाठिंबा दिला होता. शिवसेना सत्तेत गेली तर विरोधी पक्षनेतेपद मोकळे होईल आणि राष्ट्रवादी विरोधकाची भूमिका बजावेल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. सरकारला पाठिंबा द्या, अशी मागणी भाजपाने केलेली नाही. शिवाय आमच्या नेतृत्वाने शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर सुंठीवाचून खोकला जाईल, असे मत व्यक्त केले असल्याचे ते म्हणाले.पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कापसाला ६,५०० रुपये हमीभाव द्यावा, साखरेवरील आयात कर २५ टक्क्यांऐवजी ४० टक्के करावा, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करावा, जवखेड्यातील हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, आदी मागण्या केल्या. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढील आठवड्यापासून सुरू होत असून त्यापूर्वी राज्यातील शेतकरी, साखर कारखाने यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. यामुळे सरकारला कार्यवाही करण्यास पुरेसा वेळ मिळेल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील कुठलाही समाजघटक अडचणीत आला तर त्याची बाजू सभागृहात मांडणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. राज्यात आमचे सरकार असताना सरकारी मदतीचे निकष बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्त यांना विशेष मदत दिली आहे. आताही सरकारने तशीच कृती करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. (विशेष प्रतिनिधी)