शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

राष्ट्रवादीने विरोधात बसण्याची भूमिका राजकीय डावपेचाचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 06:50 IST

शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करण्याच्या तयारीत भाजप

अतुल कुलकर्णी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधात बसण्याची घेतलेली भूमिका हा राजकीय डावपेच असून, शिवसेनेला न घेता सरकार बनवण्यास तयार झालेली भाजप काही काळात राष्ट्रवादीला सरकारमध्ये सहभागी करून घेईल, असे चित्र आकाराला येत आहे. त्यामुळेच शिवसेनेला कोणीही बोलायचे नाही, ते स्वत:हून सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आले तर ठीक, अन्यथा त्यांच्याशिवाय सरकार बनवा असे आदेश दिल्लीहून भाजप नेत्यांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजपकडून कोणताही प्रस्ताव शिवसेनेला दिला जाणार नाही, असेही समजते.आम्ही विरोधात बसू, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सांगत आहेत. पण पवार जे बोलतात त्यापेक्षा वेगळेच काही करतात असा इतिहास आहे. त्यांनी २०१४ साली भाजपला स्वत:हूनच पाठिंबा देऊ केला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये फुटीची बीजे कायमची रोवली गेली. पाचही वर्षे शिवसेनेने सरकारविरोधी भूमिका घेतली. आताही मुखपत्रातून भाजपविषयी टीकेची धार कमी झालेली नाही.

त्यामुळे शिवसेना आपण सांगू, त्या अटींवर आली तरच सोबत घ्यायचे, अन्यथा त्यांच्याशिवाय सरकार स्थापन केले जाईल, अशी भूमिका भाजप नेतृत्वाने घेतली आहे. भाजपविरोधात बोलण्याची एकही संधी सेनेच्या नेत्यांनी सोडलेली नाही. शिवसेनेचे नेते जेवढा विरोध करत राहतील, तेवढे त्यांचे नुकसान होईल. असा निरोपच त्यांना देण्यात आला आहे. हवे असल्यास पूर्ण पाच वर्षे उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम देऊ आणि आपण सरकारमध्ये विरोध न करता सहभागी होत असल्याचे शिवसेनेने स्वत:हून कळविण्याची अट घाला, असे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील नेत्यांना कळवल्याचे तसेच ते न झाल्यास भाजपचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.फक्त भाजपचा शपथविधी झाला तर..?मुख्यमंत्री व अन्य काही मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर नवे सरकार अस्तित्वात येईल. नंतर आमदारांच्या शपथविधीसाठी अधिवेशन होईल. त्यात विधानसभाध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपतर्फे नाव सुचवले जाईल आणि गदारोळात अध्यक्षपदी झालेली निवड जाहीर करून अधिवेशन संपेल. हिवाळी अधिवेशन नागपुरात डिसेंबरमध्ये होईल. तोपर्यंत सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना