शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवार यांचा दोषमुक्तीसाठी काेर्टात अर्ज; काय आहे नेमकं प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 12:20 IST

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आ. रोहित पवार यांनी शिखर बँक घोटाळा प्रकरणात दोषमुक्तीसाठी मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आ. रोहित पवार यांनी शिखर बँक घोटाळा प्रकरणात दोषमुक्तीसाठी मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  १७ मार्चपर्यंत म्हणणे मांडावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरोधात आरोप आहेत. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बँकेच्या आर्थिक घोटाळाप्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद करण्याची शिफारस विशेष न्यायालयाला केली होती. ती न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे त्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने दाखल केलेले प्रकरण लागू राहत नसल्याचा दावा रोहित पवार यांच्यातर्फे दोषमुक्तीच्या अर्जात करण्यात आला आहे. रोहित पवारांसोबत राजेंद्र इंगवले व इतर पाच जणांनीदेखील दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. 

खासदार, आमदारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी या प्रकरणी ईडीला १७ मार्चपर्यंत म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. ईडीकडून आपल्याविरोधात करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा व या प्रकरणी आपल्याविरोधात खटला दाखल केला जाऊ शकत नसल्याचा दावा पवार यांनी केला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी २०१९ मध्ये गुन्हा दाखल केला होता. 

नेमके काय प्रकरण?

सहकारी कारखाने कमी किमतीत व नियमबाह्य पद्धतीने विक्री केल्याचा आरोप   होता. कन्नड सहकारी साखर कारखान्याचे ८० कोटींचे कर्ज थकीत झाल्याने शिखर बँकेने २००९ मध्ये त्या कारखान्याची मालमत्ता सरफेसी कायद्यानुसार ताब्यात घेतली होती. २०१२ मध्ये शिखर बँकेने कमी किमतीत त्याचा लिलाव केला. या प्रक्रियेत पवारांच्या अधिपत्याखालील बारामती ॲग्रो शिवाय इतर दोघांनी बोली लावली होती. मात्र, सर्वाधिक बोली लावणाऱ्याचा अर्ज तांत्रिक कारणांवरून बाद केला होता. दुसरी बोली लावणारा बारामती ॲग्रोशी संबंधित होता व त्याला कारखाना चालवण्याचा अनुभव नव्हता, असा ईडीचा आरोप आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar seeks discharge in bank scam; what's the case?

Web Summary : Rohit Pawar filed for discharge in the Shikar Bank scam. Court directs ED to respond by March 17. Allegations involve undervalued sale of cooperative factories. Police had closed the case, but ED's case continues. Pawar claims false charges.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारPoliticsराजकारण