शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

बाळासाहेब-उद्धव ठाकरेंचा 'तो' फोटो पाहून रोहित पवार म्हणाले, "मी तर निःशब्दच झालो!"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 7:54 PM

Rohit Pawar Tweet : प्रदर्शनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेवेळी काढण्यात आलेला एक फोटो होता. हा फोटो पाहून मी तर निःशब्दच झालो, असे रोहित पवार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. 

मुंबई : मुंबई विद्यापीठातील 'बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा'त दोन दिवसांपूर्वी दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली होती. यानंतर रोहित पवार यांनी या प्रदर्शनातील काही फोटो ट्विट केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेवेळी काढण्यात आलेला एक फोटो होता. हा फोटो पाहून मी तर निःशब्दच झालो, असे रोहित पवार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. 

मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदिप सावंत व मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशनने हे प्रदर्शन भरवले होते. यामध्ये अनेक छायाचित्रकारांनी वेगवेगळ्या प्रसंगी काढलेले बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते. तसेच, कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, शरद पवार यांच्यासोबतचे बाळासाहेबांनी घालवलेले क्षण कॅमेराच्या माध्यमातून टिपण्यात आले फोटो होते. जवळपास 1 हजार फोटोंपैकी निवडक 75  फोटो या प्रदर्शनात लावले होते. 

या प्रदर्शनात बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेतील उद्धव ठाकरे यांचा इमोशनल फोटो आहे. या फोटोजवळ उभा राहून आमदार रोहित पवार यांनी आपला फोटो काढला आहे आणि हा फोटो इतर फोटोंसह त्यांनी ट्विट केला आहे. हा फोटो पाहून नि:शब्द झाल्याच्या भावना त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या. "मुंबई विद्यापीठाच्या 'बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा'त भरवलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनातील हा फोटो खूप बोलका आहे. तो पाहून मी तर निःशब्दच झालो", असे ट्विटद्वारे रोहित पवार म्हणाले.

"बाळासाहेबांना खूप आनंद झाला असता"दरम्यान, मुंबई विद्यापाठातील'बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा'त भरलेल्या या प्रदर्शनाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्रमोद महाजन यांचे एकत्रित फोटो पाहून आदित्य ठाकरे यांनी दिग्गजांच्या मैत्रीपूर्ण राजकारणाच्या आठवणी जागवल्या. तसेच आज बाळासाहेब असते तर मित्राबरोबर युती करुन सरकार स्थापन केल्याचा त्यांना खूप आनंद झाला असता, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेMumbai Universityमुंबई विद्यापीठAditya Thackreyआदित्य ठाकरेSharad Pawarशरद पवार