शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आदित्य ठाकरेंपेक्षा रोहित पवार श्रीमंत, जाणून घ्या संपत्तीच विवरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 21:05 IST

रोहित पवार यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरतेवेळी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी आपली संपत्तीही रोहित पवार यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार रोहित पवार यांच्याकडे 27 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामुळे संपत्तीच्या बाबतीत रोहित पवार यांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंना मागे पाडले आहे. आदित्य ठाकरे यांची एकूण संपत्ती 16 कोटी रुपये आहे.  

रोहित पवार यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरतेवेळी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. त्यानुसार, रोहित यांची एकूण संपत्ती 27 कोटी 44 लाख 29 हजार 200 रुपये एवढी आहे. तर त्यांची स्थावर चल अचल मालमत्ता 23 कोटी 99 लाख 29 हजार 200 रुपये एवढी आहे. रोहित पवार यांच्याकडे वडिलोपार्जित 3 कोटी 45 लाख रुपयांची संपत्ती आहे. रोहित पवार यांच्या बँक खात्यात 2,75,31,034 रुपये आहेत. तर त्यांनी बॉन्ड, डिबेनचर्स आणि शेयर्समध्ये 9,65,11,071 रुपयांची गुंतवणूक केली आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट आणि विम्यामध्ये रोहित पवार यांचे 57,07,029 रुपये आहेत.

रोहित पवार यांच्याकडे 11,92,319 रुपयांची गाडी आहे. तर 11,21,732 रुपयांचं सोनं, 47,007 रुपयांची चांदी, 1,68,000 हजार रुपयांचे हिरे आणि 4,52,420 रुपयांचे इतर दागिने आहेत. रोहित पवार यांच्याकडे रोलेक्स, ओमेगा, टॅग ह्युअर, कार्टर, लॉगीनेस या कंपन्यांची घड्याळं आहेत. या घड्याळांची अंदाजे किंमत 27,91,928 रुपये असल्याचं रोहित पवार यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. रोहित पवार हे व्यवसायाने उद्योजक असून साखर कारखान्याचे संचालक आहेत. तसेच, जिल्हा परिषदेचे सदस्यही आहेत.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkarjat-jamkhed-acकर्जत-जामखेडAjit Pawarअजित पवारAaditya Thackerayआदित्य ठाकरेPoliticsराजकारणAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019