शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवार यांची साडे आठ तास ईडी चौकशी, 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 21:27 IST

ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांची सरकारवर जोरदार टीका

मनोज गडनीस 

Rohit Pawar ED Enquiry ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांची आज(दि.2) सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांनी सुमारे 8.30 तास चौकशी केली. दुपारी एकच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले अन् आता रात्री 9.15 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाबाहेर आले.  रोहित पवार पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

यावेळी रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. देशात आणि राज्यात चुकीच्या गोष्टी सुरू आहेत, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही विचारांसाठी लढत आहोत. राज्य सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या नेत्यांना वाटत असेल की, आम्ही घाबरलो आहोत. मला त्यांना एकच सांगायचे आहे, याआधी जे घाबरले ते पळून गेले, सर्वांनी बघितलं आहे, पण आम्ही घाबरणारे नाही, अशी टीका त्यांनी केली.

तसेच, आज बजेटचा दिवस असल्यामुळे सुप्रिया सुळे लोकसभेला गेल्या आहेत. सुप्रिया ताई महाराष्ट्राचा आवाज म्हणून मुद्दे मांडत आहेत. खासदार अमोल कोल्हे देखील लोकसभेत आपली जाबाबदारी पार पाडत आहेत. आपल्या अनुभवाचा फायदा राष्ट्राला व्हावा म्हणून शरद पवार हे राज्यसभेत लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी बजावत आहेत. नाहीतर काही लोकं फक्त नावासाठी आमदार, खासदार बनतात. पण आपले खासदार राज्यसभेत आणि लोकसभेत आपली जबाबदारी पार पाडत आहेत, असंही राहोत पवार यावेळी म्हणाले. 

8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावले

या चौकशीच्या संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी 8 फेब्रुवारी रोजी त्यांना पुन्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी बोलावले आहे. यापूर्वी २४ जानेवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवार यांची तब्बल 12 तास चौकशी केली होती. हे प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. या प्रकरणी 5 जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या बारातमी ॲग्रो कंपनीसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबई