शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचा २७ जानेवारीचा प्लॅन ऐनवेळी का बदलला? रोहित पवारांचा राजकीय फाईल, बडा नेता भेटण्यावरून मोठा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:23 IST

Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash: अजित पवारांचा विमान प्रवास पूर्वनियोजित नव्हता! २७ जानेवारीच्या रात्री मंत्रालयातील 'त्या' फाईलमुळे दादांचा प्लॅन बदलला. रोहित पवारांचे खळबळजनक आरोप. वाचा सविस्तर.

मुंबई : अजित पवार यांचा विमान प्रवास हा पूर्वनियोजित नव्हता, तर तो ऐनवेळी बदलेला होता, असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. २७ जानेवारीच्या रात्री नेमके काय घडले आणि कोणत्या फाईलमुळे अजित दादांना मुंबईत थांबावे लागले, याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. 

रोहित पवारांच्या दाव्यानुसार, २७ जानेवारीला संध्याकाळी अजित पवार गाडीने पुण्याला निघणार होते. त्यांचा ताफाही तयार होता. मात्र, दोन कारणांमुळे त्यांचा प्रवास रद्द झाला. पूर्व विदर्भातील एक मोठा नेता दादांना भेटायला येणार होता, त्यांना उशीर झाला. तसेच एका फाईलसाठी अजित पवारांना थांबावे लागल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. 

रोजच्या वेळापत्रकानुसार अजित पवार अधिकाऱ्यांना म्हणाले की, ४-५ तास मी माझी कामे करणार आहे. काही कार्यकर्ते, कर्मचारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. एक फार मोठे नेते त्यांना भेटण्यासाठी येणार होते, त्यांना उशीर झाला आणि अजित पवार सायंकाळी ५ वाजता निघू शकले नाहीत. पूर्व विदर्भातील हे नेते आहेत. सही करावीच लागते, फार महत्वाची फाईल आहे मग ती फाईल कुठे आहे हे पाहिले गेले तेव्हा ती फाईल घरी नव्हती. ती मंत्रालयाच्या कार्यालयात होती. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत. ती फाईल येईपर्यंत वेळ गेला. एक मोठा नेता आपल्या पक्षातील बोलत असेल तर सही करावीच लागेल. त्या फाईलसाठी अजित पवारांचा वेळ गेला. तेथील लोक आमच्याही जिवाभावाचे होते. त्यांनी जे सांगितले आहे, ते असे की कुठल्यातरी राजकीय कन्सल्टंट आहे त्यांचा जो काँट्रॅक्ट आहे त्याचा काहीच फायदा होत नाही, ते रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती. यामध्ये वेळ गेला आणि अजित पवारांना बारामतीला गाडीने जायचा प्लॅन रद्द करावा लागला, असा दावा रोहित पवार यांनी केला. 

'मोसाद' आणि घातपाताचा संशयइस्रायली गुप्तचर यंत्रणा 'मोसाद'च्या पुस्तकाचा संदर्भ देत रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "एखाद्या व्यक्तीला मारायचे असेल तर त्याचा चालक किंवा पायलट मारणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझा काका आणि राज्याचा मोठा नेता गेला आहे, आम्हाला उत्तरे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही."

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's last-minute plan change: Rohit Pawar's political file claim.

Web Summary : Rohit Pawar claims Ajit Pawar's Pune trip was canceled due to a delayed meeting with a Vidarbha leader and an important file needing his signature at the ministry. A consultant contract issue was also discussed.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटनाRohit Pawarरोहित पवार