शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अपघात ८.४३ ला मग अजित पवारांच्या घडाळ्यात ९ का वाजलेले? रोहित पवारांनी सांगितले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:05 IST

Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash news: अजित पवारांचा जळलेला स्वेटर! ९ वाजता थांबलेलं घड्याळ आणि रोहित पवारांना काय वाटलेले...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांनी आज अजित पवारांचा अपघात की घातपात यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी विमान कंपनी, डीजीसीए यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०२३ चा मुंबईतील या कंपनीच्या विमान अपघाताचा अहवाल दाबला नसता तर आज अजित पवार जिवंत असते, असा आरोप रोहित यांनी केला आहे. तसेच आपल्याला घातपातच जास्त असल्याची शंका येत असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. 

अजित पवारांच्या काही गोष्टी अपघातानंतर सापडल्या. त्यात त्यांचा जळालेला स्वेटर, घड्याळ होते. या घडाळ्यात ९ वाजले होते, असे रोहित पवार म्हणाले. विमान अपघात 8.43-8.45 या कालावधीत झाला तर मग अजित पवारांच्या मनगटातील घड्याळामध्ये ९ का वाजलेले होते, असा सवाल करत त्यांनी या शंकेचे निरसन केले. "अजितदादांचे घड्याळ नेहमी १५ मिनिटे पुढे असायचे, पण अपघातात ते बरोबर ९ वाजता बंद पडले," असे रोहित पवार म्हणाले. 

"ती बॉडी दादांची नसावी..."अपघातानंतरचे सहा दिवस रोहित पवारांसाठी अत्यंत क्लेशदायक होते. "घटनास्थळी जो मृतदेह सापडला, तो पाहून माझं मन मानायला तयार नव्हतं की ते दादा आहेत. ते कुठूनतरी परत येतील, मी त्यांना घट्ट मिठी मारेन, असंच मला वाटत होतं. पण तिथे सापडलेला त्यांचा तो अर्धवट जळलेला स्वेटर, त्यांची चप्पल आणि ते घड्याळ पाहून सत्याचा स्वीकार करावा लागला," असे रोहित पवार यांनी सांगितले. 

अपघाताची टाईमलाईन (रोहित पवारांच्या दाव्यानुसार):

सकाळी ७.५६: विमान रडारच्या संपर्कात आले.

सकाळी ८.१०: विमानाचे उड्डाण झाले.

सकाळी ८.३२: विमान सुपे गावाजवळ पोहोचले.

८.४३ ते ८.४५: विमानाचा अपघात झाला.

सकाळी ९ वाजता अपघाताची माहिती मिळाली.

सकाळी ९.४५: निधनाची पहिली अधिकृत माहिती समोर आली.

पायलटवर दबाव आणि सुरक्षेची ऐशीतैशी:

विश्रांतीचा अभाव: पायलटसाठी आवश्यक असलेला १२ तासांचा 'गॅप' पाळला जात नाही.

धमकावून उड्डाण: इन्सेंटीव्ह कापण्याची किंवा नोकरीवरून काढण्याची धमकी देऊन वैमानिकांना विमानावर बसविले जाते.

तांत्रिक हेराफेरी: उड्डाणाच्या तासांमध्ये फेरफार करणे आणि विमानातील संभाषणाची रेकॉर्ड करणारी सीव्हीआर (CVR) यंत्रणा जाणीवपूर्वक बंद ठेवली जाते.

मेन्टेनन्समध्ये कपात: कॉस्ट कटिंगच्या नावाखाली विमानाची योग्य देखभाल (Maintenance) केली जात नव्हती.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Accident: Rohit Pawar Raises Questions, Cites Time Discrepancy

Web Summary : Rohit Pawar questions Ajit Pawar's plane crash, alleging foul play. He highlights discrepancies, including the stopped watch showing 9:00 AM, while the crash occurred earlier. Rohit claims the body found may not have been Ajit Pawar's and accuses the airline of safety lapses, pilot coercion, and maintenance negligence.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामती