राखी सावंत रिपाइंच्या वाटेवर

By Admin | Updated: June 20, 2014 23:14 IST2014-06-20T22:27:58+5:302014-06-20T23:14:19+5:30

राष्ट्रीय आम पार्टीच्या माध्यमातून राजकारणात उडी घेणारी बॉलीवूड अभिनेत्री राखी रावंत लवकरच रिपब्लिकन पक्षात दाखल होण्याची शक्यता आहे.

On the Road to Rakhi Sawant RPI | राखी सावंत रिपाइंच्या वाटेवर

राखी सावंत रिपाइंच्या वाटेवर

- रामदास आठवले यांच्यासोबत चर्चा
मुंबई : राष्ट्रीय आम पार्टीच्या माध्यमातून राजकारणात उडी घेणारी बॉलीवूड अभिनेत्री राखी रावंत लवकरच रिपब्लिकन पक्षात दाखल होण्याची शक्यता आहे. रिपाइं अध्यक्ष खा. रामदास आठवले आणि राखी सावंत यांची जुहू येथील एका हॉटेलमध्ये यासंदर्भात चर्चा झाली.
आठवले यांच्यासोबत आपली सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, असे राखी सावंतने बैठकीनंतर स्पष्ट केले.
मात्र, येत्या काही दिवसांत राखीचा पक्षप्रवेश होईल व येत्या विधानसभा निवडणुकीत राखी रिपब्लिकन पक्षाचा व महायुतीचा प्रचार करताना दिसेल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. राखी सावंतला विधानसभेच्या निवडणुकीच्या तिकिटाची लॉटरी लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On the Road to Rakhi Sawant RPI