शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

नद्यांचा विळखा सैल; काठावरील गावांना दिलासा, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत, पंढरपूरचा वेढा सैल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 06:49 IST

Road Transport News: गेल्या चार दिवसांपासून राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने निर्माण झालेली पूरस्थिती आता कमी झाली आहे. धरणातून विसर्ग कमी केल्याने नद्यांमधील पाणी पातळी कमी झाली असून,  पुराच्या विळख्यातून नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.

सोलापूर/ कोल्हापूर - गेल्या चार दिवसांपासून राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने निर्माण झालेली पूरस्थिती आता कमी झाली आहे. धरणातून विसर्ग कमी केल्याने नद्यांमधील पाणी पातळी कमी झाली असून,  पुराच्या विळख्यातून नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.  त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, पंढरपूर या प्रमुख शहरांचा समावेश आहे.

भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या परिसरात पाणी शेतात आणि घरात शिरल्यामुळे भीतीचे वातावरण होते. मात्र, धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग ४५ हजार क्युसेकवर आल्यानंतर हळूहळू पूर ओसरू लागला आहे. भीमा नदीवरील आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, गोपाळपूर, कौठाळी, नांदुरे-नेवरे पूल, पंढरपूर-तिऱ्हेमार्गे सोलापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, संत पेठ येथील काही सखल भागामध्ये पुराचे पाणी शिरल्याने ७०० पेक्षा जास्त कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते.

नाशिकमध्ये पुन्हा पाऊसनाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी पावसाने हजेरी लावली. मात्र, कालपासून अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून गोदावरी नदीत सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. 

काेल्हापूर जिल्ह्यात ४१ मार्ग अद्याप पाण्याखालीच  काेल्हापूर  जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे. अद्याप ४१ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत आहे.पण कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावरील व कोल्हापूर ते शिये मार्गावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. कोयना धरणातून विसर्ग कमी केल्याने कालपासून कृष्णेच्या पुरामध्ये घट झाली असून, कृष्णेच्या पुराचा सांगली शहराला पडलेला वेढा सैल झाला आहे. 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरSolapurसोलापूरRatnagiriरत्नागिरी