काका पुतण्याच्या नात्याबाबत रितेश देशमुखचं मोठं विधान, घरातील उदाहरण देत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 03:53 PM2024-02-18T15:53:52+5:302024-02-18T15:56:10+5:30

Riteish Deshmukh News: आज लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले.  या सोहळ्याला संबोधित करताना विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने काका-पुतण्याच्या नात्याबाबत मोठं विधान केलं आहे. 

Riteish Deshmukh's big statement about uncle-nephew relationship, giving an example at home said... | काका पुतण्याच्या नात्याबाबत रितेश देशमुखचं मोठं विधान, घरातील उदाहरण देत म्हणाला...

काका पुतण्याच्या नात्याबाबत रितेश देशमुखचं मोठं विधान, घरातील उदाहरण देत म्हणाला...

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काका पुतण्याच्या जोड्या हे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत. काही काका-पुतण्यांमधील वादही महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा वादाचं केंद्र ठरलेलं आहे. दरम्यान, आज लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले.  या सोहळ्याला संबोधित करताना विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने काका-पुतण्याच्या नात्याबाबत मोठं विधान केलं आहे. 

रितेश देशमुख काका दिलीपराव देशमुख यांना उद्देशून म्हणाला की, काका मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. काका आणि पुतण्यांचं नातं कसं असावं, याचं ज्वलंत उदाहरण आज स्टेजवर आहे, अशा शब्दात रितेश देशमुख याने काकांप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. या संपूर्ण सोहळ्या वेळी देशमुख कुटुंबीय भावूक झालेले दिसले.

विलास कारखाना परिसरात आयोजित सोहळ्यात बोलताना विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेते रितेश यांना वडिलांच्या आठवणीने हुंदका आला. डोळे पानावले. अख्खे भाषण त्यांनी कंठ दाटलेल्या स्वरात केले. रितेश यांचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू आले. भाषण थांबले. त्यावेळी रितेश यांच्या आई वैशालीताई देशमुख यांचे डोळे पाणावले. बाजूला बंधू माजी मंत्री अमित देशमुख यांनी रितेश यांच्या पाठीवर हात ठेवत धीर दिला. त्यावेळी आई वैशालीताई आणि काका दिलीपराव देशमुख यांच्यासह मंचावर आणि उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 

Web Title: Riteish Deshmukh's big statement about uncle-nephew relationship, giving an example at home said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.