शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव, कथित १२ ऑडियो क्लीपमुळे संशयाचे वातावरण अधिक गडद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 06:40 IST

Pooja Chavan suicide case: राज्य मंत्रिमंडळाच्या दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीलाही संजय राठोड हजर नव्हते. आपल्या खात्याच्या बैठका व कार्यक्रमही त्यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

मुंबई : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने केली असतानाच सोशल मीडियात व्हायरल झालेल्या कथित १२ ऑडिओ क्लिप्समुळे राठोड यांच्याभोवतीचे संशयाचे वातावरण अधिक गडद झाले आहे. क्लिपमधील आवाज त्यांचाच आहे का, याची फोरॅन्सिक लॅबमध्ये चाचणी करण्याची मागणीही भाजपने केली. यावर राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते ‘नॉट रिचेबल’ आहेत.ते मुंबईतील बंगल्यावर नाहीत. यवतमाळच्या घरीदेखील नाहीत. त्यांचे मोबाइल स्विच्ड् ऑफ आहेत.  त्यांचे पीए, पीएस फोन घेत नाहीत, घेतलाच तर उडवाउडवीची उत्तरे देतात. राज्य मंत्रिमंडळाच्या दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीलाही ते हजर नव्हते. आपल्या खात्याच्या बैठका व कार्यक्रमही त्यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. मात्र ते मुंबईतच असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राठोड यांच्यावरील आरोपांबाबत बोलण्याचे टाळले. त्याबाबत मुख्यमंत्रीच काय ते सांगतील, असे ते म्हणाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी आहे. पण थेट संजय राठोड यांचे नाव घेणे योग्य ठरणार नाही, माहिती घेतल्यानंतरच बोलणे योग्य राहील. दरम्यान, पूजाच्या बहिणीने टाकलेल्या फेसबुक पोस्टचीही खूप चर्चा आहे.

‘ती’ दोन महिन्यांची गरोदर?विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १२ ऑडिओ क्लिप्स पोलीस महासंचालकांकडे पाठविल्या आहेत. एका क्लिपमध्ये एक तरुणी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे, प्रेगनन्सी टेस्ट केली असल्याचे एक जण सांगतो. त्यावर, तिने तर मला गोळ्या घेतल्या असल्याचे सांगितले होते. म्हणजे ती माझ्याशी खोटं बोलली, माझा विश्वासघात केला, असे दुसरा म्हणतो.

तिच्या डोक्यातून सुसाईडचे काढातिच्या डोक्यातून सुसाईडचं तेवढं काढा, आत्महत्या हा इलाज आहे का? ... हो! मी तिला समजावून सांगतोच आहे, तू पण समजावून सांग, काही गडबड व्हायला नको, असे संवाद या एका क्लिपमध्ये आहेत. काहीही कर, हॉस्पिटलमध्ये दोरीने चढून खिडकीतून जा पण तिचा मोबाईल आधी ताब्यात घे, अशी सूचना कथित मंत्री करीत असल्याच्या संवादाचीही क्लिप आहे.

...तर मला आत्महत्या करावी लागेलप्रकरण वाढले तर राज्यात बोभाटा होईल. तुम्ही दोघेही नामवंत आहात, असे अरुण नावाची एक व्यक्ती एका क्लिपमध्ये म्हणते. त्यावर कथित मंत्री त्याला, प्रकरण मिटव. काहीही कर नाहीतर मला संन्यास घ्यावा लागेल, माझ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येईल, असे सांगतो. 

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाणMaharashtraमहाराष्ट्र