मद्यधुंद पोलिसाचा हॉटेलमध्ये दंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:01 AM2018-04-28T01:01:12+5:302018-04-28T01:01:12+5:30

अनेकांना मारहाण; पोलीस अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावली

A riot in the liquor police's hotel | मद्यधुंद पोलिसाचा हॉटेलमध्ये दंगा

मद्यधुंद पोलिसाचा हॉटेलमध्ये दंगा

Next

पाथर्डी (जि. अहमदनगर) : तारकेश्वर गडावरील बंदोबस्तावरून घरी परतत असताना एका मद्यधुंद पोलिसाने हॉटेल चालक, ग्राहक व अन्य पोलिसांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत दंगा केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. शहरातील शेवगाव रोडलगतच्या मधुबन हॉटेलमध्ये दंगा करणाºया पोलीस उपनिरीक्षक अमोल तानाजी मालुसरे (नेमणूक-गेवराई पोलीस ठाणे) याला पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे.

मधुबन हॉटेलमध्ये अमोल गुरुवारी दुपारपासून बसला होता. त्याने रात्रीपर्यंत १९ बाटल्या बीअर रिचवली. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास त्याने धिंगाणा घालायला सुरुवात केली. समोर येईल त्या ग्राहकाला, वेटरला मारहाण केली. तसेच हॉटेलमधील फर्निचर, टेबल, खुर्च्याची मोडतोड केली.
एका युवा ग्राहकालाही मालुसरे याने विनाकारण मारहाण केली. त्यामुळे त्याने मित्रमंडळी बोलावून मालुसरे यास बेदम चोप दिला. मालुसरेने कमरेला असलेले पिस्तुल ग्राहक व हॉटेल चालकावर रोखले. हॉटेल चालक मल्हारी शिरसाठ यांनी प्रसंगावधान राखत पाथर्डी पोलीस ठाण्यात घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने दाखल होत, मालुसरेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्याच्याकडील सरकारी रिव्हॉल्व्हर टेबलवर आपटून फोडले. तसेच पोलीस उपनिरीक्षक वैभव पेटकर यांच्या दोन श्रीमुखात भडकावल्या. अखेर बºयाच झटापटीनंतर पोलिसांनी मालुसरेला ताब्यात घेतले.

Web Title: A riot in the liquor police's hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस