भाजप-शिवसेनेचा नवा वाद; महसूलमंत्र्यांना कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 07:30 PM2019-11-05T19:30:12+5:302019-11-05T19:33:30+5:30

पंढरपूर तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक; राज्यपाल अथवा शेतकºयांच्या हस्ते पूजा करण्याचे मंदिर समितीला दिले निवेदन

The revenue minister will not allow Kartik Ekadashi to perform the high priestship | भाजप-शिवसेनेचा नवा वाद; महसूलमंत्र्यांना कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही

भाजप-शिवसेनेचा नवा वाद; महसूलमंत्र्यांना कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही

Next
ठळक मुद्दे- कार्तिक एकादशीदिवशी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार शासकीय पूजा- महसुलमंत्र्यांना शासकीय पूजेपासून रोखण्यासाठी पंढरपूर तालुका शिवसैनिक आक्रमक- मंदिर समितीला दिले निवेदन; राज्यपालांच्या हस्ते पूजा करण्याचा ठेवला प्रस्ताव

पंढरपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही़ सत्तेतल्या पदांचं समसमान वाटप व्हावं, यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरूच आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे़ हा वाद सुरूच असताना आता दुसºया वादाला सुरूवात झाली आहे़ हा वाद म्हणजे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना शासकीय पूजेपासून रोखण्यासाठी आता पंढरपूर तालुका शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

कार्तिकी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी रुक्मिणी मातेच्या कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना देण्यात येऊ नये. अन्यथा पंढरपुरातील शिवसेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेनेचे तालुका संघटक संदीप केंदळे यांनी जाहीर केले आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी मागील दोन दिवसापूर्वी कार्तिकी एकादशी दिवशी होणा?्या श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजा  महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले होते.

कोल्हापूर व सांगली भागातील पूर स्थिती हाताळण्यात चंद्रकांत पाटील हे अयशस्वी झाले आहेत. पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही. पंढरपूर मध्ये ही अनेक पूरग्रस्तांना शासकीय मदतीपासून वंचित रहावे लागले आहे. पिक विमा पंचनामे शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन अपूर्ण झाले आहेत. यामुळे असल्याने चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी यात्रेनिमित्त होणारे शासकीय महापुजेचा मान घेऊ नये. चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊनच विठ्ठलाची शासकीय महापूजा हे राज्यपाल व शेतकरी करून घ्यावी. मंदिर समितीने पाटलांना पूजेपासून रोखावे अन्यथा शिवसेना त्यांना पंढरीत येऊन शासकीय महापूजा करू देणार नाही असा इशारा मंदिर समितीला पत्रकाद्वारे  शिवसेनेची तालुका संघटक संदीप केंदळे यांनी दिला आहे.

Web Title: The revenue minister will not allow Kartik Ekadashi to perform the high priestship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.