रेवस-रेड्डी सागरी मार्ग विकासाचा केंद्रबिंदू, एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 08:20 IST2025-04-12T08:18:56+5:302025-04-12T08:20:56+5:30

Eknath Shinde रेवस-रेड्डी सागरी मार्ग हा संपूर्ण कोकणच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. यामुळे पर्यटनाच्या संधी, रोजगाराला चालना मिळणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रेवदंड्यातील पारनाका येथे व्यक्त केला.

Revas-Reddy sea route is the focal point of development, Eknath Shinde expressed confidence | रेवस-रेड्डी सागरी मार्ग विकासाचा केंद्रबिंदू, एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

रेवस-रेड्डी सागरी मार्ग विकासाचा केंद्रबिंदू, एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

 रेवदंडा -  रेवस-रेड्डी सागरी मार्ग हा संपूर्ण कोकणच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या मार्गावरील सात पुलांमुळे अनेक तालुक्यांच्या दळणवळणाचा मार्ग सुकर होणार आहे. यामुळे पर्यटनाच्या संधी, रोजगाराला चालना मिळणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रेवदंड्यातील पारनाका येथे व्यक्त केला. अलिबाग तालुक्यातील चौल, रामराज विभागातील १७० कोटींच्या विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

अलिबाग तालुक्यात अनेक वर्ष रस्ते व विकासकामे झालेली नाहीत. आता १७० कोटींच्या कामात अनेक अंतर्गत रस्ते, गावाच्या दर्शनी भागात कमानी, सामाजिक सभागृह, मासळी मार्केट आदी कामे होणार असल्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची घेतली सदिच्छा भेट
रेवदंडा परिसरातील विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमापूर्वी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी निरूपणकार सचिन धर्माधिकारी उपस्थित होते. 

Web Title: Revas-Reddy sea route is the focal point of development, Eknath Shinde expressed confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.