The return journey of the saints ’footsteps; Visit of saints' padukas and Vitthal on the twelfth day | संतांच्या पादुकांचा परतीचा प्रवास; द्वादशीच्या दिवशी संतांच्या पादुकांची आणि विठ्ठलाची भेट

संतांच्या पादुकांचा परतीचा प्रवास; द्वादशीच्या दिवशी संतांच्या पादुकांची आणि विठ्ठलाची भेट

पंढरपूर (जि. सोलापूर) : आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर माउली, तुकोबांसह इतर संतांच्या पादुकांचा परतीचा प्रवास गुरुवारी सुरू झाला. यंदा कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे आषाढी वारीचा पायी पालखी सोहळा प्रशासनाने रद्द केलेला होता. यामुळे दशमीच्या रात्री शिवशाही बसमधून संतांच्या पादुका वाखरी येथील पालखी तळावर आल्या आणि त्यानंतर त्या पंढरपूरमधील मठाम्ांध्ये मुक्कामासाठी राहिल्या. आषाढी एकादशी दिवशी या पादुकांना चंद्रभागेमध्ये स्नान घालण्यात आले. यानंतर पादुकांची नगरप्रदक्षिणा झाली.

द्वादशीच्या दिवशी संतांच्या पादुकांची आणि विठ्ठलाची भेट झाली. यानंतर पादुका पुन्हा मठामध्ये आल्या आणि दुपारी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका पुन्हा एकदा फुलांनी सजवलेल्या शिवशाही बसमधून आळंदीकडे मार्गस्थ झाल्या. पंढरपूरकरांसाठी हा भाऊक क्षण होता. दरवर्षी पौर्णिमेला पंढरपूर सोडणाऱ्या पालख्यांना यावेळी द्वादशीला पंढरपुरातून आळंदीकडे जावे लागले.

शासनाने योग्य नियोजन केल्याबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी प्रशासनाचे आभार मानले. त्याचबरोबर पौर्णिमेच्या अगोदर विठोबाचा निरोप घेत असल्यामुळे दु:ख होत असल्याचे श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र पाटील यांनी सांगितले.

द्वादशीला घडली मुक्ताई श्री विठ्ठलाची भेट
मुक्ताईनगर : सावळ्या विठ्ठलास आळवणी करून आषाढी वारी सोहळ््यानिमित्त द्वादशीला पांडुरंगाची हृदय भेट घेतल्यानंतर संत मुक्ताई पालखीने जड अंत:करणाने पंढरीचा निरोप घेतला. परंपरेप्रमाणे दरवर्षी पौर्णिमेपर्यंत पंढरीत मुक्कामी राहणाºया मुक्ताई पालखी सोहळ््याला यंदा कोरोना महामारी संकटामुळे पौर्णिमेच्या तीन दिवसअगोदर पंढरी सोडावी लागली. पांडुरंगाच्या भेटीसाठी आतूर असलेल्या पालखी सोहळ्याला गुरुवारी सकाळी विठुरायाच्या दरबारात विठ्ठलाच्या भेटीची वेळ मिळाली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The return journey of the saints ’footsteps; Visit of saints' padukas and Vitthal on the twelfth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.