शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पीएसआय पदाच्या प्रलंबित परीक्षेचा निकाल फेब्रुवारी अखेरीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 8:15 PM

राज्य लोकसेवा आयोगातर्फे 26 एप्रिल 2017 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी महिना अखेरीस जाहीर केला जाईल.

ठळक मुद्देतब्बल दोन वर्षांचा कालावधी होत आला तरीही अद्याप परीक्षेचा निकाल नाही जाहीर सध्या आयोगाचा कारभार प्रभारी अध्यक्षांकडे असून आयोगाच्या सदस्यांची संख्या कमी

पुणे: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय-2017 ) पदाच्या परीक्षेचा प्रलंबित निकाल येत्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिध्द केला जाणार आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या काही विद्यार्थ्यांची मैदानी परीक्षा घेण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही .त्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.राज्य लोकसेवा आयोगातर्फे 26 एप्रिल 2017 रोजी पीएसआय पदाच्या 650,विक्रीकर निरिक्षक पदाच्या 251 आणि सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 107 पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. मात्र,तब्बल दोन वर्षांचा कालावधी होत आला तरीही अद्याप पीएसआय पदाच्या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच 2017 च्या परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्यामुळे 2017,2018 आणि 2019 मध्ये प्रसिध्द झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या विविध परीक्षेसाठी हेच विद्यार्थी पुन्हा परीक्षेस प्रविष्ट होत आहेत. वेळेवर निकाल प्रसिद्ध झाल्यास काही विद्यार्थ्यांची निवड आयोगाकडून संबंधित पदांसाठी केली जाईल. त्यातून परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. परिणामी स्पर्धा परीक्षेकडे वळलेल्या नव्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास आणि यश मिळविण्यास अधिक संधी प्राप्त होईल. त्यामुळे आयोगाने लवकरात लवकर पीएसआयसह सर्व परीक्षांचा निकाल लवकर प्रसिध्द करावा,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा 16 जुलै 2017 रोजी घेण्यात आली.या परीक्षेचा निकाल 3 ऑक्टोबर रोजी जाहीर झाल्यानंतर मुख्य परीक्षा 5 नोव्हेंबर रोजी झाली. मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 3 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर 2018 या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली.सध्या आयोगाचा कारभार प्रभारी अध्यक्षांकडे असून आयोगाच्या सदस्यांची संख्या कमी आहे.त्यामुळे पीएसआय पदाच्या मैदानी चाचणी घेण्यास विलंब होत आहे.त्यामुळे शासनाने आयोगाच्या सदस्यांच्या संख्येत वाढ करून कामास गती द्यावी,अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.--------------राज्य लोकसेवा आयोगातर्फे 26 एप्रिल 2017 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी महिना अखेरीस जाहीर केला जाईल.या परीक्षेत पात्र ठरलेल्या काही विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी घेण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.सर्व विद्यार्थ्यांची मैदानी चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निकाल प्रसिध्द होईल.- चंद्रशेखर ओक ,प्रभारी अध्यक्ष,एमपीएससी 

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षा