शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला पीएसआय परीक्षेचा निकाल अखेर जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 20:37 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या ६५० जागांसाठी ५ नोव्हेंबर २०१७ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.

ठळक मुद्देसुमित खोत राज्यात प्रथम : ६५० जागांचा निकाल जाहीर 

पुणे : गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) ६५० जागांचा निकाल अखेर शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत रत्नागिरी जिल्हयातील सुमित कल्लप्पा खोत हा राज्यात प्रथम आला आहे. महिलांमधून अश्विनी हिरे या प्रथम आल्या आहेत.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या ६५० जागांसाठी ५ नोव्हेंबर २०१७ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर निकाल जाहीर होण्यास मोठा विलंब झाला. परीक्षार्थी उमेदवारांकडून या परीक्षेचा निकाल लवकर लागावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. आयोगाकडून २०१७ नंतर २०१८ मध्ये आणखी एक परीक्षा झाली. त्याचबरोबर आता २४ मार्च रोजी पुढची पूर्व परीक्षा जाहीर करण्यात आली होती. पूर्वीच्या दोन परीक्षांचे निकाल प्रलंबित असतानाच पीएसआय पदाची पुढची जाहिरात आली, त्यामुळे ती परीक्षा द्यायची की जुन्या परीक्षांच्या निकालाची वाट पहायची अशी व्दिधा मनस्थिती उमेदवारांची झाली होती. यापार्श्वभुमीवर अखेर नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या पीएसआय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.   सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त (पूर्व) परीक्षेसाठी ३ लाख ३० हजार ९०९ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेसाठी १० हजार ३१ उमेदवार पात्र ठरले होते. मुख्य परीक्षा ५ नोव्हेंबर २०१७ रोजी पार पडली. त्यानंतर एक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ३ आॅक्टोबर ते १ डिसेंबर २०१८ या कालावधीमध्ये शारिरीक चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आली. यासाठी २ हजार ७६३ उमेदवार पात्र ठरले. महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर सविस्तर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे, निवड झालेल्या उमेदवारांची गुणांसहीत यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.  अंतिम निकालात पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे आॅनलाइन अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार