नीरव मोदी बँक गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल ६ जुलै रोजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 01:55 PM2019-06-29T13:55:28+5:302019-06-29T14:51:31+5:30

नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून तब्बल ११, ४०० कोटींचा घोटाळा केला आहे.

The results of Neerav Modi Punjab Bank fraud case will be on 6 July | नीरव मोदी बँक गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल ६ जुलै रोजी

नीरव मोदी बँक गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल ६ जुलै रोजी

Next

पुणे: हिरे व्यापारी नीरव मोदी बँकने केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणात दाखल केलेल्या दाव्याचा निकाल २९ जून रोजी पुण्यामध्ये सुनावण्यात येणार होता.मात्र, पुण्यातील कोर्ट 29 जूनपर्यत सुट्टीवर असल्याने मोदी केस संदर्भातील आदेश 6 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता दिला जाणार आहे. 
नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून तब्बल ११, ४०० कोटींचा घोटाळा केला आहे. त्यानंतर मोदी कुटुंब परदेशात पळून गेले आहे. या गैरव्यवहारप्रकरणी पंजाब बँकेने न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. तसेच मुंबई येथे डीआरटी वन मध्ये वसुली दावा दाखल केला आहे. मात्र मुंबईत येथील न्यायाधिकरणाची जागा रिक्त असल्याने परिणामी त्याचा व औरंगाबाद येथील डीआरटी चा अतिरिक्त कार्यभार सध्या पुण्याकडे आहे. पंजाब बँकेने एकूण तीन दावे नीरव मोदींविरोधात दाखल केले आहे.त्यापैकी साडेसात हजार कोटींच्या  दाव्यांची सुनावणी बुधवारी पूर्ण झाली असून त्या संदर्भातला निकाल २९ जून रोजी देण्यात येणार होता. मात्र पुणे कोर्ट २९ जूनपर्यंत सुट्टीवर असल्याने हा निकाल ६ जुलै रोजी दिला जाणार असल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे . 

Web Title: The results of Neerav Modi Punjab Bank fraud case will be on 6 July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.