शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 19:12 IST

राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र ,कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी- सीईटी परीक्षेचा निकाल येत्या मंगळवारी (दि.4) सायंकाळी 5 वाजता प्रसिध्द केला जाणार आहे. एमएचटी- सीईटीच्या अधिकृत स्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. निकालामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्व विषयाचा पर्सेंटाईल स्कोअर आणि पीसीएम आणि पीसीबी ग्रुपचा स्कोअर स्वतंत्रपणे दिला जाईल,असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 3 लाख 92 हजार 304 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले.मागील वर्षी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेस 4 लाख 35 हजार 606 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 4 लाख 19 हजार 408 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.ऑनलाईन पध्दतीने जाहीर केल्या जाणा-या निकालावर विद्यार्थ्याचे नाव,त्याच्या पालकाचे नाव,आईचे नाव यांचा उल्लेख केला जाईल.तसेच निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार आहे.त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाऊनलोड करून घेतला,याबाबतची माहितीही दिली जाईल,असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाResult Dayपरिणाम दिवसonlineऑनलाइन