शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालाचा यंदा टक्का घसरला, मागील पाच वर्षातील सर्वात कमी निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 12:09 IST

पालक आणि विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली...

ठळक मुद्दे राज्याचा निकाल हा ७७.१० टक्के

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल हा ७७.१० टक्के लागला. यंदा हा निकाल तब्बल १२ टक्क्यांनी घसरला आहे.त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांचे दडपण वाढले आहे. शनिवारी (दि. ८) सकाळी पत्रकार परिषदेत राज्य शिक्षण महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी हा निकाल जाहीर केला. मंडळाने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. या संकेतस्थळावरून विषयनिहाय गुणांची प्रतही घेता येणार आहे.  इयत्ता बारावीचा निकाल दि. २८ मे रोजी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा होती. परंतु, शनिवारी सकाळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या निकालात राज्याचा निकाल १२.टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. मागील पाच वषार्तील यंदाचा निकाल हा सर्वात कमी आहे. या परीक्षेला १७ लाख ८१३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनींचा समावेश होता. परीक्षेस बसलेल्यांपैकी एकूण उत्तीर्ण - १२४७९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

काही दिवसांपासून सोशल मीडियावरून निकालाच्या तारखांचा संदेश व्हायरल होत होता. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मंडळाकडूनही अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. अखेर मंडळाने शुक्रवारी निकालाची तारीख जाहीर केली. या परीक्षेला १७ लाख ८१३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनींचा समावेश होता.  विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यानंतर मंडळाने दिलेल्या तीन संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. आॅनलाईन निकालाबरोबरच विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही निकाल समजू शकेल. राज्यभरातून २२ हजार २२४ शाळांमधून १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 

विद्यार्थ्यांना 1 वाजता ऑनलाइन पाहता येणार निकाल..

* असा पाहा SSC निकाल www.mahresult.nic.in www.sscresult.mkcl.org www.maharashtraeducation.comwww.mahresult.nic.in 

टॅग्स :PuneपुणेSSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी