The rest of the farmers will also get debt relief; 11 lakh account holders will get Rs 8,000 crore | उर्वरित शेतकऱ्यांंनाही मिळणार कर्जमुक्ती; ११ लाख खातेदारांना मिळणार ८ हजार कोटी

उर्वरित शेतकऱ्यांंनाही मिळणार कर्जमुक्ती; ११ लाख खातेदारांना मिळणार ८ हजार कोटी

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जुलै अखेरपर्यंत सर्वांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना कोरोनाचे संकट आले. लॉकडाऊनमुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसºया यादीतील पात्र शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला. सध्या खरीप परेणीचा हंगाम सुरू झाला आहे. तिसºया यादीतील राहिलेल्या पात्र शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जुलैअखेर सव्वा अकरा लाख शेतकºयांच्या कर्ज खात्यात ८ हजार २०० कोटी रक्कम जमा करण्यात येणार आहे. ज्या शेतकºयांना सदर योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही अशा शेतकºाांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकार मंत्री पाटील यांनी केले आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The rest of the farmers will also get debt relief; 11 lakh account holders will get Rs 8,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.