शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मावळमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी सर्वस्वी माझी - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 16:03 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात धक्कादायक पराभव झाला होता.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचाही मावळ लोकसभा मतदारसंघात धक्कादायकरीत्या पराभव झाला. दरम्यान, पार्थ पवार यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. मावळमध्ये पार्थ पवार यांच्या झालेल्या पराभावीच जबाबदारी सर्वस्वी माझीच आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पार्थ पवार यांच्या पराभावाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, ‘मावळमध्ये पार्थ पवार यांच्या झालेल्या पराभावाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे.’ शिवसेना, भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपा-सेना युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार यांच्यात मुख्य लढत होती. या लढतीत श्रीरंग बारणे यांनी २, १५, ५७५ इतक्या मताधिक्यांनी विजय मिळवत विजयश्री खेचून आणली. 2014 मध्ये मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती श्रीरंग बारणे पुन्हा करतात, की पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला 'अच्छे दिन' दाखवतात, याबद्दल उत्सुकता  होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मावळमध्ये श्रीरंग बारणे यांना ७, १८,९५० मतं मिळाली असून पार्थ पवार यांच्या पारड्यात ५,०३,३७५ मते मिळाली आहेत. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवारmaval-pcमावळLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल