शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या लोकसेवा सुविधा केंद्रांना प्रतिसाद

By admin | Updated: October 4, 2015 02:39 IST

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश जारी झाल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) सर्वांत प्रथम पुढाकार घेत या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली होती.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश जारी झाल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) सर्वांत प्रथम पुढाकार घेत या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली होती. म्हाडाने सर्व मंडळामध्ये सुरू केलेल्या लोकसेवा सुविधा केंद्रांना नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांमध्ये सुमारे दीड महिन्यात विविध कामांसाठी २४८८ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ३३0 अर्ज निकाली काढण्यात म्हाडाला यश आले असल्याने लोकसेवा कायद्याच्या अंमलबजावणीत म्हाडाने आघाडी घेतली आहे. लोकसेवा हमी कायदा २0१५च्या अंमलबजावणीस म्हाडाने १३ आॅगस्टपासून प्रारंभ केला. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कायद्यांतर्गत म्हाडाने १० सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवा आॅनलाइन पद्धतीने नागरिकांना मिळाव्यात यासाठी प्रोबिटी सॉफ्टवेअरच्या मदतीने म्हाडामध्ये अद्ययावत संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. लोकसेवा सुविधेअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे एकूण १२0७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६0४ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत; तर आर आर मंडळाकडे १४५ अर्जांपैकी ३१ अर्ज निकाली काढले आहेत. कोकण मंडळाकडे १५७ अर्जांपैकी ७३ अर्ज निकाली काढले आहेत, तर नागपूर मंडळाकडे २८४ अर्जांपैकी १९७ अर्ज निकाली काढले आहेत. एकूण प्राप्त अर्जांपैकी ११४ अर्ज नाकारण्यात आले असून, ५१७ अर्ज निकाली काढण्याचे काम म्हाडामार्फत सुरू आहे.