शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कायद्यातील बदलांना विरोध

By admin | Updated: February 10, 2015 02:56 IST

‘मेक इन महाराष्ट्र’अंतर्गत राज्य सरकारने कामगार कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. या बदलांना सर्वच कामगार संघटनांकडून कडाडून विरोध होत आहे.

मुंबई : ‘मेक इन महाराष्ट्र’अंतर्गत राज्य सरकारने कामगार कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. या बदलांना सर्वच कामगार संघटनांकडून कडाडून विरोध होत आहे. त्यातच सरकारमध्ये धाकट्या भावाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना प्रणीत भारतीय कामगार सेनेनेही कायद्यातील संभाव्य बदलांविरोधात राज्य बंद पाडू, असा इशारा दिला आहे.भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी सरकारने प्रस्तावित कामगार कायद्यांविरोधात कृती समिती तयार केल्यास राज्य बंद पाडू, अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’कडे व्यक्त केली. कायद्यातील प्रस्तावित बदलांमुळे कंत्राटी कामगारांसह कायम सेवेत असलेल्या कामगारांचे रोजगार धोक्यात येणार आहेत. शिवाय कंत्राटी कामगारांच्या रोजगाराची हमी राहणार नसून मोठ्या प्रमाणात शोषण होण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात अद्यापतरी इतर संघटनांशी चर्चा झाली नसल्याचे महाडिक यांनी सांगितले. मात्र कामगारांच्या हितासाठी संघटनांनी राजकारण बाजूला ठेवावे, असे आवाहनही महाडिक करतात. जर बदल कामगारांच्याविरोधातले असतील तर सरकारमध्ये असूनही अन्य संघटनांसोबत आंदोलनात सक्रिय होऊ, असा दावाही महाडिक करतात.अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष सुभाष देसाई म्हणाले, ठेकेदार आणि मालक वारंवार कामगार कायद्याकडे दुर्लक्ष करतात. मालकांनी कामगार कायद्याचे पालन करावे, म्हणून गेल्या कैक वर्षांपासून संघटना झगडत आहेत. सरकारने कायद्याची कडक अंमलबजावणी करून कामगारांना बळ देण्याऐवजी थेट कायदाच मोडीत काढण्याची तयारी सुरू केली आहे. परिणामी, कंत्राटी कामगारांची सामाजिक सुरक्षाच धोक्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघानेही (एनटीयूआय) प्रस्तावित बदलांविरोधात निदर्शनांचे आयोजन केले आहे. संघटनेचे सचिव मिलिंद रानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारतर्फे रोजगारनिर्मितीच्या नावाखाली सरकार कंत्राटी कामगार कायदा, सुरक्षा रक्षक कायदा, हमाल माथाडी कायदा, औद्योगिक कलह कायदा आणि फॅक्टर अ‍ॅक्टमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यामुळे मालकांना मुक्त अधिकार मिळतील, ज्यामुळे ठेकेदार आणि मालक कामगारांचे शोषण करतील. परिणामी, कष्टकरी कामगारांची परिस्थिती आणखी बिकट होईल. (प्रतिनिधी)