शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

संशोधन हीच विकासाची जननी

By admin | Updated: February 6, 2015 00:57 IST

मागील १०० वर्षांपूर्वीच्या समाजाशी तुलना केली असता प्रगतीचा आलेख हा झपाट्याने उंचावला असल्याचे लक्षात येते. विशेषत: आता तर विज्ञानाला आणखी गती आली आहे. हा सर्व बदल संशोधनामुळेच दिसून येत आहे.

वेदप्रकाश मिश्रा : रसायनशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटननागपूर : मागील १०० वर्षांपूर्वीच्या समाजाशी तुलना केली असता प्रगतीचा आलेख हा झपाट्याने उंचावला असल्याचे लक्षात येते. विशेषत: आता तर विज्ञानाला आणखी गती आली आहे. हा सर्व बदल संशोधनामुळेच दिसून येत आहे. खऱ्या अर्थाने संशोधन ही विकासाची जननी आहे, असे मत कऱ्हाड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पदव्युत्तर रसायनाशास्त्र विभाग, पोरवाल कॉलेज व इन्स्टिट्यूट आॅफ फॉरेन्सिक सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान ते बोलत होते.‘फ्युचरिस्टिक मटेरिअल्स अ‍ॅन्ड इमर्जिंग ट्रेन्ड्स इन फॉरेन्सिक अ‍ॅन्ड लाईफ सायन्सेस’ या विषयावरील या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.के.सी.देशमुख, प्रा.एन.बी. सिंग, विजयकुमार शर्मा, रसायनशास्त्र विभाग प्रमुख एच.डी. जुनेजा, डॉ. एम.एन.घोशाल, डॉ. अंजली राहाटगावकर, जर्मनी येथील प्रा. जे.कोल्हर, नायजेरिया येथील प्रा.गॉडविन ओनू हे प्रामुख्याने उपस्थित होते. यशस्वी व्यावहारिक संशोधनाची परिणती नवे तंत्रज्ञान निर्माण करण्यात होते. तंत्रज्ञानामुळे आयुष्य सुखकर आणि सोपे करण्यासाठी नवनवीन वस्तू व गॅजेट्स तयार होतात. शिवाय वाहतूक, दळवळण, संचार आणि आरोग्य यासांरख्या क्षेत्रातदेखील प्रगतीची झेप दिसून येत आहे.देशाचा विकासदेखील विज्ञानातूनच शक्य आहे असे डॉ.मिश्रा म्हणाले. विकासाचे दुष्परिणामदेखील दिसून येत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानासमोर प्रदूषणाचे मोठे आव्हान आहे . शिवाय मनुष्याची जागा रोबोट घेत असल्याने रोजगारावरदेखील परिणाम होण्याचा धोका आहे, असे मत डॉ. विनायक देशपांडे यांनी व्यक्त केले. या परिषदेला १९ आंतरराष्ट्रीय संशोधक, ४६ राष्ट्रीय दर्जाचे संशोधक आणि ५०० च्या वर प्राध्यापक, संशोधक, ख्यातनाम व्यक्ती आणि उद्योजक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर धोंडगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)