शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

RERA कायद्यात बदल, बिल्डरला आता १ फ्लॅट एकालाच विकता येणार, ग्राहकांची फसवणूक टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 20:49 IST

RERA Act : एका बिल्डरला एक प्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ठळक मुद्देरेरा (RERA) कायद्यात महत्वाचा बदल करण्यात आला आहे.

मुंबई : घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता यापुढे घर खरेदी करताना बिल्डकरांकडून  ग्राहकांची फसवणूक होणार नाही. कारण, रेरा (RERA) कायद्यात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. (RERA Act changed, builder can now sell 1 flat alone, avoid customer fraud)

आता यापुढे कुठल्याही विकासकाला एक फ्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नाही. यापूर्वी फसवणुकीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यात एक बिल्डर एकच प्लॅट अनेकांना विकतो. कालांतराने तो फ्लॅट विकत घेणाऱ्याला आपली फसवणूक झाल्याचं कळते. तो अनेक ठिकाणी दाद मागायला जातो. असे अनेल लोक आमच्याकडेही येतात. पण कायद्यात याबाबत काहीच तरतूद नसल्यामुळे त्यावर कारवाई होऊ शकत नव्हती, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच, आता आता RERA कायद्यात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे एका बिल्डरला एक प्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

याचबरोबर, एखादा प्लॅट विकल्यानंतर आता त्याची संपूर्ण माहिती बिल्डरला RERA कायद्यानुसार ऑनलाईन करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे एखादा प्लॅट कुणाला विकला गेला आहे, याची माहिती उपलब्ध असणार आहे. कायद्यातील या बदलामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे. अशा प्रकरणाची फसणवूक करण्याचा प्रयत्न झाल्यास बिल्डरला कायद्यातील बदलानुसार अटक केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची होणारी फसवणूक आता टळणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

टॅग्स :Rera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtraमहाराष्ट्र