शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जनहित याचिका फेटाळताना वकिलावर ठपका

By admin | Updated: August 14, 2016 01:19 IST

शीव कोळीवाडा येथील एका झोपडपट्टी पुनर्विकास योजनेस आव्हान देणारी जनहित याचिका करणाऱ्या उज्ज्वला जे. पाटील या याचिकाकर्तीस मुंबई उच्च न्यायालयाने २५ हजार

मुंबई : शीव कोळीवाडा येथील एका झोपडपट्टी पुनर्विकास योजनेस आव्हान देणारी जनहित याचिका करणाऱ्या उज्ज्वला जे. पाटील या याचिकाकर्तीस मुंबई उच्च न्यायालयाने २५ हजार रुपये दंड ठोठावला आणि तिच्यावतीने काम पाहणाऱ्या उदय प्रकाश वारुंजीकर आणि बाळासाहेब देशमुख या दोन वकिलांवर व्यावसायिक गैरवर्तनाचा ठपका ठेवला.एक तर ही याचिका ‘झोपु’ योजनेचे काम बरेच झाल्यावर विलंबाने करण्यात आली. शिवाय आधी याच योजनेच्या विरोधात झोपडपट्टीवासियांनी केलेल्या ११ याचिका फेटाळल्या असल्याने ही याचिका जनहिताच्या दृष्टीने केलेली याचिका ठरत नाही. अशा प्रकारे जनहित याचिकेचा दुरुपयोग करून न्यायालयाचा वेळ वाया घालविल्याबद्दल न्या. विद्यासागर कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने याचिकाकर्तीने दाव्याच्या खर्चापोटी २५ हजार रुपये भरावेत, असा आदेश दिला. ही रक्कम पाटील यांनी चार आठवड्यांत न्यायालयात जमा करायची आहे. जमा झाल्यावर ती रक्कम टाटा कर्करोग रुग्णालयास दिली जाईल.आधीच्या याचिका झोपटपट्टीवासियांनी त्यांना राहत्या जागेतून हुसकावून लावले जाण्याविरुद्ध केल्या होत्या. त्या फेटाळल्या गेल्या. जागा खाली करण्यासाठी वाढवून दिलेली मुदत मे महिन्यात संपल्यावर ही याचिका केली गेली. प्रकल्प राबविणाऱ्या विकासकाचे ज्येष्ठ वकील प्रवीण समदानी यांनी ही बाब निदर्शनास आणली. एवढेच नव्हे तर आधीच्या याचिकांना जोडलेल्या सहपत्रांपैकी काही सहपत्रे जशीच्या तशी या याचिकेसही जोडली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.आधीच्या याचिकांमध्येही याचिकाकर्त्यांसाठी अ‍ॅड. वारुंजीकर व अ‍ॅड. देशमुख यांनीच काम पाहिले होते. त्यामुळे याच विषयाशी संबंधीत याचिका आधी केल्या गेल्या होत्या व त्या फेटाळल्या गेल्या होत्या, ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून देणे हे वारुंजीकर व देशमुख यांचे कर्तव्य होते. पण त्यांनी तसे न करणे हे वकिलाकडून अपेक्षित असलेल्या व्यावसायिक वर्तनास धरून नाही, असेही समदानी म्हणाले.ही चर्चा सुरु होती तेव्हा वारुंजीकर दुसऱ्या न्यायालयात होते. समदानी यांच्या प्रतिपादनाचा देशमुख यांनी इन्कार केला व याचिकाकर्तीने आपल्याला जी माहिती दिली तेवढयाच आधारे याचिका करणे हे आपले काम आहे. आधीच्या याचिकांची माहिती देणे आपल्यावर बंधनकारक नाही, असेही ते म्हणले. तेवढ्यात वारुंजीकर आले व त्यांनी यापुढे आपण तुमच्यासाठी काम करणार नाही, असे याचिकाकर्तीस आधीच सांगितले आहे, असे त्यांनी न्यायालयास सांगितले. न्यायालयाने हे अमान्य केले व याचिकार्तीच्या वकिलाचे वर्तन व्यावसायिक नैतिकतेला धरून नाही, असा ठपका ठेवला. (विशेष प्रतिनिधी)वकिलाची बांधिलकी कोर्टाशी- इंग्लंडच्या हाऊस आॅफ लॉर्ड्सचे लॉर्ड डेनिंग यांनी सन १९६६ मध्ये रॉन्डेल वि. वेलस्ली प्रकरणात दिलेल्या निकालातील उतार उद्धृत करून खंडपीठाने म्हटले: आपण आपल्या अशिलाचे केवळ ‘माऊथपीस’ आहोत त्यामुळे अशिल सांगेल तेवढेच आपण बोलावे किंवा आपण अशिलाच्या हातचे साधन असल्याने तो सांगेल तेवढेच करावे, असे वकिलाने मानणे चुकीचे आहे.- वकिलाची बांधिलकी केवळ अशिलाशी नव्हे तर सत्याशी आणि न्यायाशी असते. त्याने जाणूनबुजून कोणतेही सत्य न्यायालयापासून दडवून ठेवू नये. वकिलाची पहिली बांधिलकी न्यायालयाशी आहे. त्यामुळे अशिल जे सांगेल ते या कर्तव्याच्या आड येणारे असेल तर ते वकिलाने ऐकण्याची मुळीच गरज नाही.