शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेले तीन उड्डाणपूल पुन्हा पालिकेच्या पटलावर

By admin | Updated: June 3, 2015 03:24 IST

ठाणे शहरात मीनाताई ठाकरे चौक, तीन पेट्रोल पंप, नौपाडा एक्सचेंज अशा तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय २००७ मध्ये मुंबई महानगर प्रदेश

ठाणे : ठाणे शहरात मीनाताई ठाकरे चौक, तीन पेट्रोल पंप, नौपाडा एक्सचेंज अशा तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय २००७ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला होता. परंतु ही खर्चीक बाब असल्याने आणि यात काही तांत्रिक बाबी पुढे आल्याने या उड्डाणपुलांची कामे रखडली होती. अखेर आता एमएमआरडीएने त्यांच्या कामांना ग्रीन सिग्नल दिला असून, त्यानुसार २२३.७० कोटींचा तीन उड्डाणपुलांचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी ठेवला आहे.शहरातील मीनाताई ठाकरे चौक, तीन पेट्रोल पंप आणि नौपाडा एक्सचेंज या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात २४ डिसेंबर २००७ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हे काम एमएसआरडीसीला देण्यात आले. परंतु याचा खर्च अधिक असल्याने त्यांनी हे काम करण्यास नकार दिला. त्यानुसार तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या कार्यकाळात या तीन उड्डाणपुलांऐवजी येथे एकच तीन किमीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात येऊन याचा प्रस्तावही तयार झाला. परंतु या एका उड्डाणपुलाचा खर्च हा दुप्पट झाल्याने एमएमआरडीएने हा निधी देण्यास नकार दिला. पालिकेने पुन्हा एकऐवजी तीन उड्डाणपुलांचा प्रस्ताव तयार केला. त्यानुसार काँक्रीटऐवजी स्टीलचे डिझाइन तयार करण्यात आले. म्हणजेच या उड्डाणपुलांचे प्रत्येक गर्डर हे स्टीलमध्ये तयार केले जाणार होते. परंतु याचाही खर्च अवास्तव असल्याने सुमारे २०० कोटीपर्यंतचा निधी देऊ, त्यावरील सर्व खर्च पालिकेने करावा, असे प्राधिकरणाने पालिकेला कळविले. तसेच प्लॅनमध्ये काही बदलही सुचविले होते. अखेर एमएमआरडीएने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुसरून व शहरांतर्गत झालेल्या वाहतूक बदलांचा विचार करून नव्याने प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. त्यानुसार लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर मीनाताई ठाकरे चौक, अल्मेडा चौक व महात्मा गांधी पथवर टेलीफोन एक्सचेंज चौक येथे हे तीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. या ठरावाला २० नोव्हेंबर २०१३ च्या महासभेने आणि ०७ मे २०१४ रोजी एमएमआरडीएने याला ग्रीन सिग्नल दिला असून, २२३.७० कोटींचा निधी देण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. केवळ या कामाच्या तांत्रिक पर्यवेक्षणाचे काम पालिका करणार आहे. (प्रतिनिधी)