आजारी रुग्णाला नेण्यास रिक्षाचालकाचा नकार, रुग्णाचा मृत्यू
By Admin | Updated: December 21, 2014 17:35 IST2014-12-21T17:35:51+5:302014-12-21T17:35:51+5:30
कोल्हापूरमध्ये हॉस्पिटलमध्ये जाण्यास रिक्षाचालकाने नकार दिल्याने एका आजारी रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

आजारी रुग्णाला नेण्यास रिक्षाचालकाचा नकार, रुग्णाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २१ - भाडे नाकारण्याची रिक्षा चालकांची मुजोरी आता प्रवाशांच्या जीवावरही बेतू लागली आहे. कोल्हापूरमध्ये हॉस्पिटलमध्ये जाण्यास रिक्षाचालकाने नकार दिल्याने एका आजारी रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने सदरबाजार परिसरातील रिक्षा स्टँडची तोडफोड केली आहे.
सुर्वैदिवाण येथील रिक्षा स्टँडवर एक आजारी रुग्ण व त्याचे नातेवाईक रुग्णालयात जाण्यासाठी आले होते. मात्र रिक्षाचालकाने त्यांना रुग्णालयापर्यंत नेण्यास दिला. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र रिक्षाचालकाने मुजोरी दाखवल्याने रुग्णालयात जाण्यासाठी विलंब होत गेला. या सर्व गोंधळात रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समजते. हा प्रकार समजताच संतप्त जमावाने सुर्वेदिवाण रिक्षा स्टँडची तोडफोड केली.