शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 14:13 IST

दोन लाख रुपयांवरील कर्जमुक्तीच्या टप्प्यासाठी प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आश्वासनपूर्ती करण्याकडे वाटचाल केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्याचवेळी नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महाविकास आघाडीचे सरकार दिलासा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या पुढे कर्जमुक्ती देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जे शेतकरी कर्जाची  नियमीत परतफेड करतात, त्यांच्यासाठीही काही तरी दिलासा देणारी बाब प्रत्यक्षात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. 

मंदीच्या काळात शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त होत असताना त्यांना कोणी वाली राहिला नाही. शेतकऱ्यांना मजबूत केले पाहिेजे. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही. दोन लाख रुपयांवरील कर्जमुक्तीच्या टप्प्यासाठी प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.