शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळात प्रादेशिक फूट!

By admin | Updated: April 8, 2015 01:43 IST

महाराष्ट्राचा विभागवार अनुशेष दूर व्हावा यासाठी नेमलेल्या केळकर समितीच्या अहवालावरील चर्चेने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रादेशिक फुटीची बीजं रोवली

अतुल कुलकर्ण, मुंबईमहाराष्ट्राचा विभागवार अनुशेष दूर व्हावा यासाठी नेमलेल्या केळकर समितीच्या अहवालावरील चर्चेने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रादेशिक फुटीची बीजं रोवली. शिवाय पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून नेत्यांना आपापल्या भागांचे प्रतिनिधित्व करण्यासही या समितीच्या अहवालाने भाग पाडल्याचे चित्र आज राज्यासमोर आले. विधानसभेत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या अहवालाच्या काही शिफारशी नक्कीच मान्य केल्या पाहिजेत, असे सांगत अभ्यासपूर्ण विवेचन केले; मात्र त्यांच्याच पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विधान परिषदेत पक्षीय अस्मिता बाजूला सारत संपूर्ण अहवाल केराच्या टोपलीत टाकण्याची मागणी केली. विधानसभेत भाजपा सदस्य राजेंद्र पाटणी, डॉ. अनिल बोंडे यांनी अहवालावर कडाडून टीका केली तर याच पक्षाच्या नेत्या शोभाताई फडणवीस यांनी मात्र हा अहवाल स्वीकारण्याची मागणी केली. दोन्ही पक्षांच्या सदस्यांमधील हे टोकाचे मतभेद दोन्ही सभागृहांत दिसत असताना राज्यमंत्री असणारे शिवसेनेचे विजय शिवतरे यांनी पश्चिम महाराष्ट्राची बाजू घेत अवघ्या विदर्भाचे सदस्य अंगावर घेतले. माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात या विषयावर चर्चा करताना प्रादेशिक फुटीची बीजं रोवली जाऊ नयेत, अशी अपेक्षा केली खरी; पण दोन्ही सभागृहांमधील भाषणांनी केवळ फुटीचीच नाहीतर पक्षातल्या सदस्यांनादेखील एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे काम केले आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी पश्चिम महाराष्ट्राची बाजू घेतली तेव्हा भाजपाचेच सदस्य त्यांच्या अंगावर धावून गेले. विदर्भाकडे मुख्यमंत्री पद असताना विदर्भाच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेण्याच्या तयारीत विदर्भाचे आमदार नव्हते. तर उर्वरित महाराष्ट्र म्हणजे फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही, त्यात खानदेश आणि कोकणसुद्धा येतो असे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना सांगावे लागत होते. टोकाचा विरोधाभास केळकर समितीने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उभे करण्यात मात्र यश मिळवले. उद्यादेखील या अहवालावर चर्चा होणार आहे. सरकारने हा अहवाल स्वीकारला किंवा नाकारलेला नाही. दोन्ही सभागृहांतील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकार यावरील ‘अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ तयार करेल आणि केळकर समितीच्या शिफारशी मान्य करायच्या की नाही याचा अंतिम निर्णय सरकार घेईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे.