शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

अन्य समाजातील पत्नीला नांदवायला नकार

By admin | Updated: January 21, 2017 03:26 IST

प्रेमविवाहाच्या चार महिन्यांनंतर अन्य समाजातील पत्नीला नांदवायला नकार देणाऱ्या पतीला नेरूळ पोलिसांनी अटक केली

नवी मुंबई : प्रेमविवाहाच्या चार महिन्यांनंतर अन्य समाजातील पत्नीला नांदवायला नकार देणाऱ्या पतीला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. समाजात बदनामी होत असल्याचे कारण सांगून त्याने कुटुंबीयांच्या सांगण्यावरून पत्नीला दूर केले होते. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संकेत देवळे असे नेरूळ पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने चार महिन्यांपूर्वी अन्य समाजातील तरुणीसोबत मंदिरात प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून ते दोघे नेरूळमध्येच भाडोत्री घरामध्ये राहत होते. मात्र त्यांच्या लग्नाची कल्पना संकेतच्या कुटुंबीयांना नव्हती. यामुळे तो ठरावीक वेळी पत्नीकडे तर इतर वेळी कुटुंबासोबत राहायचा. परंतु काही दिवसांपासून त्याने पत्नीकडे जाण्याचे टाळले होते. यामुळे पत्नीने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घरच्यांना आपल्या लग्नाविषयी कळले असून, त्यांचा तुला विरोध असल्याचे सांगितले. तसेच तुझ्यासोबत लग्न केल्यामुळे समाजात बदनामी होत असल्याचेही कारण सांगत पत्नीला नांदवायला नकार दिला होता. यामुळे पीडित तरुणीने १८ जानेवारीला नेरूळ पोलिसांकडे पतीविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यांतर्गत संकेत देवळे याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले. त्याशिवाय संकेतची आई व बहीण यांच्यावरही छळवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकतपास करत आहेत. (प्रतिनिधी)