शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माझे 3 लाखांचे विज बिल कमी केले, मग सामान्यांचे का नाही? भाजपा आमदाराचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 21:07 IST

आमदार गणपत गायकवाड यांनी घेतला आक्षेप, महावितरणने केले 3 लाखांनी बिल कमी

डोंबिवली : लॉकडाऊन काळात वीज वितरण कंपन्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ बिलं आकारली गेली. नागरिकांनी अनेक आंदोलन केल्यानंतरही विजबील कमी करण्यात आले नाही. मात्र, कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विजबिलातून 3 लाख रुपये कमी करण्यात आले. यावरुन गणपत गायकवाड यांनी महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. आमदाराच्या कार्यालयाचे विजबील कमी होतं, मग सर्वसामान्य नागरिकांचे विजबिल का कमी होत नाही? असा सवाल आमदारांनी उपस्थित केला.

आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाचे महावितरणाने तब्बल 5 लाख रुपयांचे विजबील पाठवले होते. इतकी मोठी रक्कम पाहून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने महावितरण कार्यालयात जाऊन चौकशी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी बिलातून तब्बल 3 लाख रुपये कमी केले. त्यामुळे गणपत गायकवाड आक्रमक झाले आहेत.“आमदाराला तुम्ही 3 लाख रुपये कमी करुन देत आहात. मग सर्वसामान्य नागरिकांना 200, 400 किंवा 500 रुपये का कमी करुन देत नाहीत? महावितरणाचा भोंगळ कारभार सर्वांना दिसून येतोय”, अशी टीका गणपत गायकवाड यांनी केली.

“मी आमदार आहे. कार्यालयात काहीतरी विचारणा करेल, गोंधळ घालेल, या भीतीने बिलातून 3 लाख कमी केले. आमदाराच्या कार्यालायचे बिल होते म्हणून तत्काळ कारवाई झाली. पण सर्वसामान्यांचे काय?”, असा सवाल गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला.

“सर्वसामान्य जनता महावितरणाच्या कार्यालयापर्यंत पोहोचत नाही. काही नागरिक तिथे पोहोचले तर अधिकारी काहीतरी हिशोब दाखवतात. जे बिल आलंय ते भरा. मीटरमध्ये काही प्रोब्लेम असेल तर आम्ही नंतर बघू, असं अधिकारी सांगतात”, असं गणपत गायकवाड म्हणाले.“महावितरणाच्या भोंगळ कारभारावर सर्वसामान्य जनता संतापली आहे. काही दिवसांपूर्वी मी माझ्याच कार्यालयात महावितरणाचा कॅम्प लावला होता. लोकांचं विजबील कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणdombivaliडोंबिवलीBJPभाजपा