शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Rain Alert ! पुढील ४८ तासांत गुजरातसह महाराष्ट्रात सर्वत्र वादळी पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 18:55 IST

१८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान राज्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता....

ठळक मुद्देअरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार; ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यताबंगालच्या उपसागरात तयार होतेय कमी दाबाचे क्षेत्र

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राला मिळाल्यानंतर आता आता अरबी समुद्रात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पुढील ४८ तासांत ओमानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे गुजरातसह महाराष्ट्रात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशजवळ आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण होऊन अरबी समुद्रात जाताना नुकत्याच आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिला आहे. शनिवारी सकाळी अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते शनिवारी सकाळी गुजरातच्या वेरावळपासून ३८० किमी, मुंबईपासून ४४० किमी तसेच ओमानपासून १६०० किमी दूर आहे. येत्या ४८ तासात ते आणखी सक्रिय होऊन पश्चिमेकडे ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील २४ तास सौराष्ट्र, कच्छच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 

बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशाजवळ नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून येत्या २४ तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या २४ तासांत विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडला. कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

१८ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. १९ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

२० ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.़़़़़़़़़वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यताकोकणातील बहुतांश जिल्ह्यात १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात १९ व २० ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरीfloodपूर