शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

लक्ष्यपूर्तीसाठी ६०० कोटींची वसुली हवी, वसुली न झाल्यास संबंधित सहा. आयुक्तांवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:49 IST

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीबरोबरच इतर करांची वसुली न झाल्यास संबंधित सहायक आयुक्तांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता महापालिका हद्दीत करवसुलीची मोहीम जोमाने सुरू झाली आहे.

ठाणे - ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीबरोबरच इतर करांची वसुली न झाल्यास संबंधित सहायक आयुक्तांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता महापालिका हद्दीत करवसुलीची मोहीम जोमाने सुरू झाली आहे.विविध करांचा भरणा करण्यासाठी जनजागृती, नोटिसा बजावणे, मालमत्ता सील करणे, नळजोडणी खंडित करण्यासह विविध उपाय योजले जाऊ लागले आहेत. त्यानुसार, फेब्रुवारी २०१८ अखेर १७७५.८८ कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ २१५.९५ कोटींनी अधिक आहे. परंतु, असे असले तरी दिलेले २४३९.४२ कोटींचे लक्ष्य गाठण्यासाठी आता अवघा एक महिन्याचा अवधी शिल्लक असून अद्यापही ६०० कोटींची वसुली शिल्लक असल्याने आयुक्तांनी हे पाऊल उचलले आहे.मालमत्ताकर आणि पाणीपट्टीचे दिलेले उद्दिष्ट साध्य न झाल्यास संबंधित सहायक आयुक्त आणि त्या परिमंडळाचे उपायुक्त यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. तसेच जे थकबाकीदार आहेत, त्यांची नावे जाहीर करण्याबरोबरच त्यांची नळजोडणी खंडित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारीअखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत १५५९.९४ कोटींची वसुली झाली होती. यंदा त्याच कालावधीत १७७५.८८ कोटींची वसुली झाली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत २१५.९५ कोटींनी अधिक आहे. परंतु, अद्यापही निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा हे उत्पन्न तब्बल ६०० कोटींनी कमी आहे. त्यामुळे हे लक्ष्य गाठण्यासाठी पालिका आयुक्तांनी उपरोक्त इशारा दिला आहे. मालमत्ताकर विभागाला यंदा ५०८ कोटींचे लक्ष्य दिले असताना या विभागाने फेब्रुवारीअखेरपर्यंत ३८८ कोटींची वसुली केली आहे.दुसरीकडे शहर विकास विभागानेदेखील मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३३.१० कोटींची वसुली कमी करून पिछाडी घेतली आहे. मागील वर्षी या विभागाने ४४५.४७ कोटींची वसुली केली होती.यंदा मात्र ती ४१२.३७ कोटींवर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २५.९५ कोटींची अधिक वसुली केली आहे. मागील वर्षी या विभागाने ५४.४३ कोटींची वसुली केली होती. यंदा मात्र ८०.३८ कोटींची वसुली केली आहे. दरम्यान, यंदा पाणीपुरवठ्याची वसुली मात्र काही अंशी का होईना वाढली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत या विभागाने ५.२७ कोटींची अधिकची वसुली केली असल्याने ही पाणीपुरवठा विभागासाठी जमेची बाजू मानली जात आहे. परंतु, दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी या विभागाला अद्यापही ५४.४३ कोटींची वसुली करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यानुसार, थकबाकीदारांचे नळजोडण्या कापणे आदींसह इतर योजनांचा अवलंब केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षी या विभागाने ६५.३० कोटींची वसुली केली होती. यंदा मात्र ७०.५७ कोटीच वसूल केले.एकूणच ठाणे महापालिकेतील या महत्त्वाच्या विभागांसोबतच इतर विभागांनादेखील थकबाकी आणि वसुलीसाठी लक्ष्य देण्यात आले आहे. त्यानुसार, आतापर्यंत विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या वसुलीनुसार पालिकेच्या तिजोरीत १७७५.८८ कोटींचे उत्पन्न आले आहे. मागील वर्षी ते १५५९.९४ कोटी एवढे होते.मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ २१५.९५ कोटींनी अधिक आहे. असे असले तरीदेखील एकूण दिलेल्या २४३९.४२ कोटींचे लक्ष्य पार करण्यासाठी अद्यापही ६०० कोटी वसूल होणे आवश्यक असून यासाठी एक महिन्याचाच अवधी शिल्लक राहिला आहे.१२० कोटींची वसुली अद्याप बाकीगेल्या वर्षीच्या तुलनेत मालमत्ता कराची वसूली सुमारे ६० कोटींनी अधिक असली तरीही लक्ष्य गाठण्यासाठी एका महिन्यात या विभागाला १२० कोटींची वसुली करायची आहे. तर, स्थानिक संस्थाकर बंद झाला आणि आता जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे या करापोटी येणाºया वसुलीत मात्र घट झाली आहे. स्थानिक संस्थाकरापोटी गेल्या वर्षी १५७.२५ कोटींची वसुली झाली होती. परंतु, यंदा मात्र केवळ ७१.०४ कोटीच वसूल झाले आहेत. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे