Record Daily corona virus patient and death toll in the Maharashtra | Coronavirus :राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचा उच्चांक; दिवसभरात ६८ हजार ६३१ बाधित

Coronavirus :राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचा उच्चांक; दिवसभरात ६८ हजार ६३१ बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कठोर निर्बंधानंतरही कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता तसूभरही कमी झालेली नाही. या उलट राज्यातील रोज दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंच्या संख्येचा उच्चांक गाठत असल्याने कोरोनाचे संकट राक्षसाचे रुप धारण करत आहे. राज्यात रविवारी ६८ हजार ६३१ रुग्ण आणि ५०३ मृत्यूंची नोंद झाली आहे, परिणामी कोरोना बाधितांची एकूण संख्या ३८ लाख ३९ हजार ३३८ असून मृतांचा एकूण आकडा ६० हजार ४७३ झाला आहे.


सध्या राज्यात ६ लाख ७० हजार ३८८ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आऱोग्य विभागाने दिली आहे. राज्यात मागील २४ तासांत ४५ हजार ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३१ लाख ६ हजार ८२८ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ५०३ ५०३ मृत्यूंमध्ये मुंबई ५३, ठाणे १३, ठाणे मनपा ५, नवी मुंबई मनपा १४, कल्याण डोंबिवली मनपा १, उल्हासनगर मनपा १, मीरा भाईंदर मनपा ३, पालघर १, वसई विरार मनपा ३, रायगड १७, पनवेल मनपा ४, नाशिक २, नाशिक मनपा ३, अहमदनगर ६१, अहमदनगर मनपा २७, जळगाव २४, जळगाव मनपा १६, नंदूरबार १९, पुणे ९, पुणे मनपा ३६, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ४,  कोल्हापूर १, सांगली ४, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग २, रत्नागिरी १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ३, जालना ४, परभणी ९, परभणी मनपा ८, लातूर १३, लातूर मनपा ६, उस्मानाबाद १२, नांदेड १३, नांदेड मनपा ११, अकोला १, अकोला मनपा ४, अमरावती २, अमरावती मनपा १, यवतमाळ १०, वाशिम ४, नागपूर ५,  रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत दिवसभरात ८ हजार ४७९ रुग्ण, तर ५३ मृत्यू
राज्यासह मुंबईत कठोर नियम लावल्यानंतरही दैनंदिन रुग्णसंख्या व मृत्यूंच्या संख्येत फरक पडलेला नाही. कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता गडद होत असून, प्रशासनासमोर नियंत्रणाचे आव्हान कठीण होत चालले आहे. मुंबईत रविवारी ८ हजार ४७९ रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाख ७९ हजार ३११वर पोहोचला आहे तर रविवारी ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १२ हजार ३४७वर पोहोचला आहे. ८,७८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ४ लाख ७८ हजार ३९वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्यात ५०१३ रुग्णांची वाढ
nठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार १३ रुग्ण रविवारी आढळले. जिल्ह्यातील रुग्णसंख्येत एक आठवड्यापासून एक हजारापेक्षा अधिक रुग्णांची घट झाली आहे. मात्र मृतांची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. आज जिल्ह्यात ४२ जणांचे निधन झाले. जिल्ह्यात आता चार लाख १६ हजार ३८१ रुग्णांसह मृतांची संख्या सहा हजार ९४२ नोंदवली आहे.
nठाणे शहरात एक हजार ५९३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख सहा हजार ३२४ झाली आहे. या शहरात पाच मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ५५२ झाली. कल्याण-डोंबिवलीत एक हजार ४७५ रुग्णांची वाढ झाली असून पाच जणांचे मृत्यू झाले. आता एक लाख सहा हजार ३३ बाधितांसह एक हजार ३२२ मृत्यूची नोंंद करण्यात आली.
nउल्हासनगरमध्ये १८० रुग्ण सापडले असून चार जणांचे मृत्यू झाले. येथील बाधितांची संख्या १७ हजार २७० झाली. भिवंडीला ७१ बाधित आढळले असून एकही मृत्यू नाही. मीरा-भाईंदरमध्ये ३३७ रुग्ण आढळले असून ११ मृत्यू आहे. अंबरनाथमध्ये १२२ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला. येथे बाधित १५ हजार २८२ असून मृत्यू ३४२ झाले आहेत. बदलापूरमध्ये २२७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित १६ हजार २५२ झाले आहेत. 

nमुंबईत सध्या ८७ हजार ६९८ सक्रिय रुग्ण आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४५ दिवस इतका आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Record Daily corona virus patient and death toll in the Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.