दक्ष नागरिक म्हणून मिळालेली बक्षीसाची रक्कम गलगली देणार नाम फाउंडेशनला
By Admin | Updated: March 7, 2016 17:41 IST2016-03-07T17:41:05+5:302016-03-07T17:41:05+5:30
दक्ष नागरिक म्हणून मिळालेले बक्षीसाचे पैसे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या संस्थेला देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले

दक्ष नागरिक म्हणून मिळालेली बक्षीसाची रक्कम गलगली देणार नाम फाउंडेशनला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - दक्ष नागरिक म्हणून मिळालेले बक्षीसाचे पैसे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या संस्थेला देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. गलगली यांना माहिती अधिकारातील दक्ष नागरिक म्हणून 11 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. पुण्यातील सजग नागरिक मंचाने रविवारी त्यांना गौरवले. माहिती अधिकार क्षेत्रामध्ये गलगली यांनी बजावलेल्या कामगिरीसाठी हा सन्मान होता.
नाना व मकरंद यांच्या नाम फाउंडेशनसाठी हे पैसे देणार असल्याचे गलगली यांनी सांगितले.
सरकार व प्रशासन यांनी पारदर्शकता आणावी यासाठी माहिती अधिकार हे चांगले हत्यार असल्याचे एक कार्यकर्ते निखिल डे यांनी सांगितले. अर्थात, काही वेळा ते ब्लॅकमेलिंगसाठी वापरलं जातं आणि असे प्रकार संपूर्णपणे बंद व्हायला हवेत असंही डे म्हणाले.