Maharashtra Political Crisis: “अन्यथा आता उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, आम्हीही हल्ले...”: अब्दुल सत्तार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 15:42 IST2022-08-03T15:42:29+5:302022-08-03T15:42:41+5:30
Maharashtra Political Crisis: असे हल्ले आमच्या आमदारांवर होत असेल तर, बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.

Maharashtra Political Crisis: “अन्यथा आता उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, आम्हीही हल्ले...”: अब्दुल सत्तार
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कारवर हल्ला झाला होता. याप्रकरणी काही शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदे गटातून आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष आता पुढच्या टप्प्यावर जाताना पाहायला मिळत आहे. बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनीही याबाबत भाष्य केले आहे. अन्यथा आता उद्धव ठाकरे यांच्यावरही कारवाई करावी लागेल, असे सत्तार यांनी म्हटले आहे.
आमच्या आमदारांवर असे हल्ले होत असेल, तर आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील. या हल्ल्याचा जितका निषेध करावा, तितका कमी आहे. ही तत्वाची लढाई आहे, ती निश्चित लढावी. पण असा हल्ला करणं चुकीचं आहे. असे हल्ले आमच्या आमदारांवर होत असेल तर आम्हालाही त्यांच्यावर असे हल्ले करावे लागेल. एकाकडून मारल्या जात असेल तर दुसऱ्याकडून बघायची भूमिका घेतल्या जाऊ शकत नाही, असा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंवरही कारवाई व्हायला हवी
या हल्ला करणाऱ्या दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई कारवाई करावी. तसेच या हल्ल्याची मागे कोण आहे, याचा सुद्धा शोध घ्यायला हवा, अशी मागणी सत्तार यांनी केली. तर, शिवसेना नेते बबन थोरात यांच्या विधानावर बोलताना सत्तार म्हणाले की, बबन थोरात यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. त्यांच्यावरही योग्य ती कारवाई होईल. कोणी असे वक्तव्य करत असेल आणि उद्धव ठाकरे त्यांचा सत्कार करत असतील, तर उद्धव ठाकरेंचा यासर्व प्रकाराला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.